Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना अटक होणार? दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Abhijeet Dipke Arrest Delhi Protest : अभिजीत दीपके हे आंदोलनासाठी मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मात्र, त्यांना दिल्ली विमानतळावर पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Abhijeet Dipke News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काॅक्रोच जनता पार्टीने (CJP) आज आंदोलनाची हाक दिली आहे. जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे मुंबई विमानतळावरून सकाळी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते 10 वाजत दिल्लीत पोहोचणार आहेत. मात्र,दिल्ली पोलिसांकडून त्यांनी विमानतळावरच ताब्यात घेतले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारने नवी दिल्लीने 163 कलम लागू केले आहे. त्यामुळे मोर्चे, आंदोलनाला बंदी घालण्यात आली आहे. जंतर मंतरवर जो आंदोलक पोहोचत आहे त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे. तर, इतर आंदोलकांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांनी परवानगीसाठी सात ऑक्टोबरला निवेदन दिले होते. तर, आंदोलन 10 ऑक्टोबरला होते. त्यामुळे निवेदन देण्यासाठी असलेल्या आणि आंदोलनाच्या तारखेबाबत नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकरण्यात आली आहे.

CJP Abhijeet Dipke
CJP Delhi Protest: "माशीला मारायला हातोड्याची काय गरज?" सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; सीजेपीच्या आंदोलनावेळी रेल्वे, मेट्रो सेवा बंद न ठेवण्याचे कोर्टाचे निर्देश

सामान्य लोकांन त्रास का?

भाजपने नेत्यांनी सीजेपीच्या आंदोलनावर टीका केली आहे. ते म्हणाले, या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीत अशांतता निर्माण करण्याचा डाव आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. भारत हा लोकशाहीवादी देश आहे. विरोधी प्रदर्शनामधून आपली बाजू मांडली गेली पाहिजे मात्र कायदा सुव्यस्था मोडण्याचा काम कोणी करू नये, असे देखील घोष यांनी सांगितले.

CJP Abhijeet Dipke
CJP Protest: ‘ज्ञानू आता तुझी पाळी आली’ कॉक्रोजच्या आंदोलनात प्रकाश राज यांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com