ACB raid Case : 30 हजारांच्या लाचेसाठी पडली धाड अन् घरात सापडले तब्बल 4 कोटींचे घबाड! उपसंचालकाच्या घरातील 'ते' दृश्य पाहून ACB ही चक्रावली

anti corruption bureau raid news : ३० हजारांच्या लाचेच्या आरोपावरून टाकलेल्या धाडीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी तब्बल ४ कोटींची रोकड सापडली. या कारवाईमुळे अधिकाऱ्याच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Odisha Corruption Case
Odisha Corruption CaseSarkarnama
Published on
Updated on

30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त झाल्याने तपास यंत्रणाही चकित झाले आहेत. नोटांचे इतके बंडल होते की मोजणीसाठी मशीनही अपुरी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही कारवाई ओडिशा राज्यातील खाण विभागातील उपसंचालक देबब्रत मोहंती यांच्यावर करण्यात आली. त्यांना लाच घेताना दक्षता पथकाने अटक केली. एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी 30 हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.

Odisha Corruption Case
BJP Rajya Sabha Candidates : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! भाजपच्या राहिलेल्या 3 जागांसाठी तावडेंसह दानवे, मुंडे, पाटील यांची नावे चर्चेत

मंगळवारी रात्री अटकेनंतर एसीबीने एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. भुवनेश्वर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये, भद्रक जिल्हा येथील मूळ गावी असलेल्या घरात आणि कटक येथील कार्यालयात तपास करण्यात आला. या धाडीत सर्वात मोठा धक्का भुवनेश्वरमधील फ्लॅटमध्ये बसला.

फ्लॅटमध्ये ट्रॉली बॅगमध्ये कोंबून ठेवलेले नोटांचे बंडल सापडले. अधिकाऱ्यांनी मोजणी केली असता एकूण रक्कम 4 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय त्यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमधून 1 लाख 20 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. तपासादरम्यान भुवनेश्वरमध्ये असलेले आलिशान दोन मजली घर आणि सुमारे 130 ग्रॅम सोनेही सापडल्याची माहिती देण्यात आली.

Odisha Corruption Case
Sandipan Bhumre Press : 'एकाही आरोपात तथ्य नाही!' संदीपान भुमरेंनी थोपटले दंड; अंबादास दानवे यांना कोर्टात खेचणार, नेमका काय आहे 'हिबानामा' वाद?

राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड जप्ती असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. केवळ 30 हजार रुपयांच्या लाचेपासून सुरू झालेल्या या कारवाईत कोट्यवधींचा साठा उघड झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com