Arvind Kejariwal News : ईडीचा खळबळजनक दावा, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय; तिहार जेल प्रशासनाला दिले 'हे' आदेश

Delhi High Court Order : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी ईडीने अटक केली. ते सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. त्यांना प्रथम ईडीच्या कोठडीत आणि आता 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आहे. त्यानंतरही न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नव्हता, पण आता ईडीने केजरीवालांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. त्यात आम आदमी पक्षही मैदानात उतरला आहे, पण आपचे आधारस्तंभ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अटक केल्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसला आहे. याचवेळी जामिनासाठी हालचाली करूनदेखील न्यायालयाने केजरीवालांना दिलासा दिलेला नाही. आता ईडीकडून केजरीवालांवर गंभीर आरोप केला आहे.

Arvind Kejriwal
Loksabha Election : 'साडेतीन लाख मतांनी मीच विजयी होणार', महादेव जानकरांना कॉन्फिडन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत. केजरीवाल यांना त्यांच्या घरून डबा येतो त्यात आंबे, मिठाई हे जेवण दिलं जात आहे. केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांनी गोड खाऊ नये हे सांगितलं असतानाही ते हे पदार्थ खात आहेत, असं ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात (High Court) सांगितले आहे.

तसेच केजरीवाल हे जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत, जेणेकरून त्याच्या आधारे ते मेडिकल कारणासाठी जामीन मागू शकतात, अशी शक्यता ईडीकडून (ED) वर्तविण्यात आली आहे. ईडीच्या या दाव्यानंतर न्यायालयाने तिहार जेल प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यात ईडीने केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल यांना टाइप 2 डायबेटिज आहे, तरीही ते तुरुंगात बटाटा, आंबे आणि मिठाई खात असल्याचे ईडीने म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मागील 48 तासांत त्यांना सहा धक्के बसले आहेत. त्यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एका मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडून केजरीवाल यांच्याभोवतीचा फास अधिक आवळला जाऊ लागला आहे.

R

Arvind Kejriwal
Solapur Lok Sabha : माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का?; प्रणिती शिंदेंचा बोचरा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com