Kerala Result : निकालाच्या आधीच भाजप नेत्याचे वक्तव्य चर्चेत, 'मी आमदार झालो...', लावली एक कोटींची पैज

Kerala Assembly Elections 2026 Result : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदूचेरीमध्ये काय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Kerala Assembly Elections; BJP PC George
Kerala Assembly Elections; BJP PC George sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे

  2. एक्झिट पोल्सनुसार केरळमध्ये यूडीएफला आघाडी मिळण्याची शक्यता

  3. भाजप नेते पीसी जॉर्ज यांनी विजयासाठी एक कोटी रुपयांची पैज लावण्याची तयारी दर्शवली

Kerala BJP PC George News : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता देशाला लागली आहे. काही तासांत केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदूचेरी मधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून कोणाची सत्ता येणार हे देखील स्पष्ट होईल. पण त्याआधी केरळमध्ये सत्तांतर होईल अशी शक्यता एक्झिट पोल्समधून वर्तवली जात आहे. सध्या याची जोरदार चर्चा होत असतानाच भाजप वरिष्ठ नेते पी.सी.जॉर्ज यांनी थेट आपल्याला 'आमदार झाल्यासारखं वाटतं...' असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण एक कोटी रुपयांची पैज लावायला तयार असल्याचे देखील म्हटले आहे. यामुळे सध्या त्यांच्या विजयाचा आत्मविश्वासाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे केरळमध्ये डाव्यांची सत्ता कालसा होईल असे भाकीत एक्झिट पोल्समधून केले जात आहेत. केरळमध्ये सोमवारी (ता.४) मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. त्याच्याआधी मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी सोशल मीडिया हँण्डलवरून त्यांच्या पदाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यांनी केलेल्या या कृतीमुळे आता तर्कवितर्क काढले जात असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

अशातच भाजपचे जॉर्ज यांनी ओपण चॅलेंज देत तब्बल एक कोटी रुपयांची पैज लावायची तयारी दाखवली आहे. त्यांनी, आपण मोठ्या मताधिक्क्यानं विजयी होणार असून यात कोणाला संशय असेल तर त्यांनी समोर यावं. आपण एक कोटी रुपयांची पैज लावायला तयार आहोत. भाजपचे नेते जॉर्ज हे पूंजार मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांचा मुलगा हा देखील पाला विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहे.

Kerala Assembly Elections; BJP PC George
Assembly Elections Result : देशाचं लक्ष लागलेल्या ‘या’ हायहोल्टेज लढतींनी वाढविली धडधड; भाजप, काँग्रेस, तृणमूलला धक्का बसणार?

जॉर्ज यांनी यावेळी फक्त आपल्याबाबत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला नाही, तर त्यांचा मुलगाही विजयी होईल असे म्हटले आहे. विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी दोघेही विधानभवनात प्रवेश करु, असा दावा केला आहे. तसेच केरळमध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वात भाजपला मोठे यश मिळणार असून भाजप सत्तेत येईल.

इतर कोणत्या पक्षाला हुमत मिळणार नाही. पण काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूडीएफला सर्वाधिक जागा मिळतील, असाही अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर माकपच्या नेतृत्त्वातील एलडीएफला देखील जागा मिळतील असे म्हणत भाजपला 1 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोण आहेत पी.सी. जॉर्ज?

जॉर्ज हे केरळमधील भाजपचे अनुभवी नेते असून ते सातवेळा आमदार झाले आहेत. आता २०२६ मध्ये देखील ते पक्षाकडून उमेदवार असून ते पुंजारमधील लोकप्रिय नेते आहेत. जॉर्ज यांच्यासमोर विद्यमान आमदार कुलंथुकल आणि यूडीएफचे साजी जोसेफ यांचं आव्हान आहे. पूंजार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण जॉर्ज हे गेल्या तीन एक दशकापासून सहा वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. तसेच जार्ज यांनी 2019 मध्ये केरळ जनपक्षम सेक्युलर पक्ष स्थापन केला होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तो त्यांनी भाजपमध्ये विलीन केला.

Kerala Assembly Elections; BJP PC George
Keralam Assembly Elections: महाराष्ट्राच्या भाजप टीमने केरळच्या विधानसभा निवडणुकीत यंदा भोपळा फोडण्यासाठी कंबर कसली!

FAQs :

1. कोणत्या राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे
केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी

2. एक्झिट पोल्स काय सांगतात
केरळमध्ये यूडीएफला आघाडी मिळण्याची शक्यता आहे

3. पीसी जॉर्ज यांनी काय विधान केले
ते विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करत एक कोटी रुपयांची पैज लावायला तयार असल्याचे म्हणाले

4. पीसी जॉर्ज कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत
ते पूंजार मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

5. त्यांच्या कुटुंबातील आणखी कोण निवडणूक लढवत आहे
त्यांचा मुलगा पाला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com