

Bageshwardham Baba News: बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. ते नेहमी अध्यात्मासह सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही भूमिका मांडताना कशाचीही तमा बाळगताना दिसून येत नाही.आता त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर घोघांवणारं संकट आणि इंधन टंचाईवर तिखट शब्दांत भाष्य केलं आहे.
धीरेंद्रशास्त्रींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि इंधन वापरावरील आर्थिकभार यावर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. त्यात त्यांनी आजमितीला राजकीय नेत्यांचे पगार आणि चार्टर्ड विमान वापराबाबत आपली भूमिका मांडली आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री यांनी एका कार्यक्रमात देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. त्यांनी नेत्यांचे पगार किमान तीन महिन्यांसाठी थांबवण्याची आणि चार्टर्ड विमानांच्या वापरास बंदी घालण्याची मागणी केली आहे.
बागेश्वर बाबा त्यांच्या मिश्किल शैलीत म्हणाले, जेव्हा जेव्हा पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याचा किंवा संसाधनांचे संवर्धन करण्याचा विषय येतो,तेव्हा सर्वसामान्य जनतेला त्याग आणि बचत करण्याचे आवाहन केले जाते.
मात्र, जेव्हा कधी संकट किंवा आर्थिक चणचण भासते,तेव्हा त्याचा भार हा केवळ सर्वसामान्य लोकांवर टाकू नये. अशावेळी राजकारण्यांना आणि जबाबदारीच्या पदांवर असलेल्यांना एक आदर्श घालून देण्याचे आवाहनही केले.
देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी राजकारण्यांनीही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणजे यातून मग समाजातील सर्वच घटक राष्ट्रीय हितासाठी समान योगदान देत असल्याचा संदेश जनतेला देण्यासाठी राजकारण्यांचे पगार किमान तीन महिन्यांसाठी थांबवले गेले पाहिजेत अशी मोठी मागणीही त्यांनी यावेळी सरकारकडे केली.
धीरेंद्रशास्त्री यांनी यावेळी भारतीय रुपया कमजोर होत आहे, त्याला मजबूत करा,असंही म्हटलं. तसेच आता सामान्य लोकांनी काय करावे? जाऊ द्या, आम्हाला काय करायचे आहे? असा सवाल उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.