New Delhi News: काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत मोठी फूट पडली होती. पक्षाचा तरुण आक्रमक चेहरा असलेल्या राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेच्या सात खासदारांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी तातडीनं भाजपमध्ये प्रवेश केला होता.आता यापैकी राघव चड्ढांवर भाजपकडून काही दिवसांतच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीकडून राघव चड्ढांवर पक्षात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच अतिशय मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे. चड्ढा यांची शनिवारी(ता.23) राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतची राज्यसभेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्याकडे याचिका समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या समितीत 10 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
याचिका समितीत राघव चड्ढा यांच्यासह सुभाशिष खुंटिया, हर्ष महाजन, संतोष कुमार पी, जेबी माथेर हिशाम, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, ,रंगव्रा नारझारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष अडचणीत असतानाच राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेतील सहा खासदारांनी गेल्या महिन्यात 27 एप्रिल रोजी बंडाचं निशाण फडकवत अचानकपणे भाजपची वाट धरली होती. हा केजरीवालांसह आपसाठीही मोठा धक्का होता.
आपच्या राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंह साहनी या राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर संतापलेल्या आपने या सर्व खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना अपात्र करण्याबाबतची मागणी करत सभापतींना पत्रही दिलं होतं.
संविधानातील दहाव्या अनुसूचीतील तरतूद महत्त्वाची ठरते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, एखाद्या पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना अपात्र ठरवले जात नाही. म्हणजेच, ही प्रक्रिया “विलीनीकरण” म्हणून मान्य केली जाते आणि संबंधित खासदारांची सदस्यता कायम राहते.
सध्या राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण 10 खासदार आहेत. यापैकी 7 खासदार एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात जात असतील, तर ते कायदेशीरदृष्ट्या वैध मानले जाते. म्हणजेच 2/3 म्हणजेच सुमारे 66 टक्क्यांपेक्षा जास्त सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो, जो या प्रकरणात पूर्ण होत असल्याचा दावा केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.