Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोईची गँग दहशतवादी संघटना घोषित! कॅनडा सरकारचा मोठा निर्णय

Lawrence Bishnoi: खून आणि खंडणीसारख्या अनेक दोन डझनभर गंभीर गुन्हे दाखल असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोई याची स्वतःची गुन्हेगारांची टोळी आहे.
Lawrence Bishnoi gang
Lawrence Bishnoi gangSarkarnama
Published on: 
Updated on: 

Lawrence Bishnoi: खून आणि खंडणीसारख्या अनेक दोन डझनभर गंभीर गुन्हे दाखल असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोई याची स्वतःची गुन्हेगारांची टोळी आहे. या टोळीमध्ये सुमारे ७०० शार्पशुटर्स असल्याचं सांगितलं जातं. अशाच काही गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या लॉरेन्स बिश्नोई हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. याच बिश्नोई गँगचे काही लोक हे कॅनडामध्ये स्वतःची टोळी चालवत आहेत. या टोळीच्या विघातक कृत्यांमुळं कॅनडा सरकारनं लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळं आता बिश्नोई गँगवर कॅनडात मोठे निर्बंध असणार आहेत.

Lawrence Bishnoi gang
Local Body Election : आमदार - खासदारांना बळ देणारी नवी पिढी राजकारणाच्या वाटेवर; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सरकारनं लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सार्वजनिक सुरक्षामंत्री गैरी आनंदसांगरी यांनी याची घोषणा केली. यासंदर्भात जाहीर केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, बिश्नोई गँग ही एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना आहे. जी मुख्यतः भारतात सक्रीय असून कॅनडातही यांची गँग भारतीय समुदयात कार्यरत आहे.

Lawrence Bishnoi gang
Maharashtra Flood: राज्यात अतिवृष्टी, महापुरामुळं शेती, जनावरांचं मोठं नुकसान! सर्वसामान्य जनतेवर नेमका काय होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर

याबाबत मंत्री गैरी यांनी म्हटलं की, कॅनडात प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात आणि समुदयात सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळं सरकार म्हणून त्यांची सुरक्षा करणं आमची मुलभूत जबाबदारी आहे. पण कॅनडात बिश्नोई गँगकडून विशिष्ट समुदयाला दहशतवादी कारवाया, हिंसा आणि धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळं दहशतवादी कृत्यांमध्ये समावेश असेलल्या या टोळीला दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यानं आम्हाला त्यांच्यावर आरोप निश्चित करणं तसंच त्यांच्या कारवाया थांबवण्यात शक्तीशाली साधनं उपलब्ध होऊ शकतील.

Lawrence Bishnoi gang
GST 2.0 : कंपन्यांनी आधी वस्तूंच्या किंमती वाढवल्या मग सरकारनं जीएसटी कमी केला! काय आहे गोलमाल जाणून घ्या

बिश्नोई गँगवर काय आहेत आरोप?

कॅनडा सरकारनं सांगितलं की, बिश्नोई गँग हत्या, गोळीबार यांसारख्या कारवायांमध्ये गुंतलेली आहे. तसंच जबरदस्तीनं खंडणी वसूल करणं तसंच जीवे मारण्याच्या धमक्या देऊन ते दहशत पसरवत आहेत. ही बिश्नोई गँग प्रवासी समुह, त्यांच्या प्रमुख सदस्यांना, व्यावसायिकांना तसंच सांस्कृतिक पुढाऱ्यांना निशाणा बनवून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेचं वातावरण तयार करत आहेत, असं कॅनडाच्या सरकारनं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.