

Chirag Paswan: कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या १० ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातून जेनझी तरुण आणि नागरिक दिल्लीत येण्याची शक्यता असून यामुळं संपूर्ण शहरात चक्का जाम होऊ शकतो.
ही परिस्थिती लक्षात घेता या आंदोलनात सहभागी होणाऱ्या अनेकांनी पोलिसांनी नोटीसा पाठवल्या असून केंद्र सरकारनं तर दिल्लीत येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आणि शहरांतर्गत मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री १० वाजल्यापासून उद्या रात्रीपर्यंत इंटरनेट सेवाही बंद ठेवली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपप्रणित एनडीएतील घटकपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
हरयाणातील सोनिपत इथं एका पदवीदान समारंभाला हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी बोलताना चिराग पासवान यांना पत्रकारांनी उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद ठेवल्याबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना चिराग पासवान म्हणाले, "हे भारताचे तरुण आहेत, त्यांना कोणीही रोखू शकत नाही.
जे लोक अशा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मी विचारतो की, एखादी व्यक्ती नक्की किती गाड्या रोखू शकते? किती कनेक्टिव्हिटी खंडीत केली जाऊ शकते? किती रस्ते अडवले जाऊ शकतात? हे भारताचे तरुण आहेत. त्यांच्याकडे जगाला दिशा दाखवण्याची क्षमता आहे, जशी क्षमता आधीच्या पिढ्यांनी दाखवून दिली होती आणि म्हणूनच, त्यांना कोणीही रोखू शकत नाही"
दरम्यान, "केंद्र सरकारनंच रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं कदाचित चिराग पासवान यांना ठावूक नसावं", त्यामुळं त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया दिली असावी, असं अनेक युजर्सनं म्हटलं आहे. तर इतर काही युजर्सनं म्हटलं की, "आता चिराग पासवान यांचं मंत्रीपद धोक्यात येणार आहे"... तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं की, "चराग पासवान नक्कीच पलटी मारतील असं वाटतंय"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.