CJI Suryakant : न्यायालयात काळा कोट घालण्याची परंपरा बंद होणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं मोठं वक्तव्य

CJI Suryakant on family court judicial dress code : दिल्ली येथील रोहिणी भागात फॅमिली कोर्टाच्या पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना भारताचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी फॅमिली कोर्टामध्ये वकील आणि न्यायाधिशांना काळे गणवेश हवेत का? असा सवाल केला.
CJI Suryakant
CJI Suryakant addresses an event in Delhi, suggesting lawyers and judges avoid black coats in family courts to reduce fear among children.Sarkarnama
Published on
Updated on

Family court dress code : देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकील आणि न्यायाधीशांनी काळे कोट परिधान करु नयेत, असा मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता कुटुंब न्यायालयात काळे कोट घालणं बंद होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली येथील रोहिणी भागात फॅमिली कोर्टाच्या पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी फॅमिली कोर्टामध्ये काळे गणवेश हवेत का? असा सवाल केला. शिवाय मला तर वाटतं की नको, कारण यामुळे लहान मुलांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, असं ते म्हणाले.

तसंच कुटुंब न्यायालयात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातून भीती घालवण्यासाठी वकिलांनी आणि न्यायाधीशांनी काळे कोट परिधान करु नयेत. तसं केलं तर मुलांच्या मनात या रंगाची भीती बसणार नाही, असा सल्ला सरन्यायाधीशांनी या कार्यक्रमात बोलताना दिला.

CJI Suryakant
Congress Politics : मोठी बातमी! काँग्रेस खासदाराचा राजीनामा, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिवाय यावेळी त्यानी कुटुंब न्यायालयाचं नाव 'कुटुंब समस्या समाधान केंद्र' असं ठेवलं जावं असंही वक्तव्य केलं. तर फॅमिली कोर्ट फक्त निर्णय देणारी संस्था नव्हे तर मानवी मूल्यं, परस्परांमधली नाती यामध्ये सुधारणा आणण्यासाठी उपलब्ध होणारा हा मंच आहे.

CJI Suryakant
Sushma Andhare Allegations Rupali Chakankar : राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुषमा अंधारे यांचे चाकणकरांकडे बोट; काय आहे प्रकरण?

राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुषमा अंधारे यांचे चाकणकरांकडे बोट; काय आहे प्रकरण?त्यामुळे कुटुंब समस्या समाधान केंद्र असं नाव दिलं तर ते जास्त योग्य ठरेल असंही सरन्यायाधीश म्हणाले. त्यामुळे आता सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार कुंटुब न्यायालयात न्यायाधिश आणि वकील काळा कोट घालणं बंद होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com