CJP Protest: आशुतोष रांका, सौरव दास सुटले! कोर्टाकडून जामीन मंजूर, 7 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून येणार बाहेर; कोर्टानं काय म्हटलं?

CJP Protest: कॉक्रोच जनता पार्टीचे पहिल्या फळीतले नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या विशेष कोर्टानं बुधवारी त्यांचा जामीन मंजूर केला.
Saurav Das, Ashutosh Ranka
Saurav Das, Ashutosh Ranka
Published on: 
Updated on: 

CJP Protest: कॉक्रोच जनता पार्टीचे पहिल्या फळीतले नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या विशेष कोर्टानं बुधवारी त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळं आता ७ दिवसांनंतर या दोघांचीही तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना कोर्टानं न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

७ दिवसानंतर होणार सुटका

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं १२ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. पण आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्लीत पोहोचल्यानंतर विमानातूनच ताब्यात घेतलं होतं. तसंच दिल्लीत असलेल्या आणि दिल्लीकडं निघालेल्या इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी आहे त्याच ठिकाणी ताब्यात घेतलं होतं. पण दिपके, रांका आणि दास यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि वर्षभर कायदा-सुव्यवस्था बिघडेल असं कुठलंही आंदोलन न करण्याच्या अटीवर सोडून दिलं होतं.

Saurav Das, Ashutosh Ranka
Raj Thackeray: देशात राजकीय भूकंप होणार? राहुल गांधी, संजय राऊतांनंतर आता राज ठाकरेही म्हणाले, "पुढच्या पाच महिन्यात..."

पण तरीही दुसऱ्याच दिवशी रांका आणि दास हे पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आणि जंतर-मंतरच्या दिशेने आंदोलनासाठी निघाले आणि बॅऱिकेट्सवर चढले, असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि कोर्टात हजर केलं. त्यानंतर कोर्टानं त्यांना पाच दिवसांची न्यायालयीनं कोठडी सुनावली. दोन दिवसांपूर्वी त्यांची कोठडी संपणार होती पण कोर्टानं त्यात आणखी दोन दिवसांनी वाढ केली. त्यामुळं एकूण ७ दिवस या दोघांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर आजही पोलिसांनी आणखी दिवसांची कोठडी मागितली होती, तर दुसरीकडं सीजेपीनं जामिनासाठी अर्ज केला होता, अखेर त्यांचा जामीन कोर्टानं मंजूर केला आणि त्यांची सुटका झाली.

Saurav Das, Ashutosh Ranka
Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाने 'शिंदेशाही'ची कोंडी, राजकीय संघर्षाला नवे वळण!

दरम्यान, सीजेपीनं स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट (SEM) कोर्टाच्या १९ ऑक्टोबरच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टानं सीजेपीच्या दोन्ही सदस्यांना फटकारलं होतं. त्यानंतर काही त्रृटींमुळं त्यांनी आपला अर्जही मागे घेतला होता. एसएमई कोर्टानं दोन दिवसांच्या वाढवलेल्या कोठडीविरोधात दोघांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com