Odisha Train Accident
Odisha Train AccidentSarkarnama

Train Accident: ओडिशात भीषण रेल्वे अपघात; 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती तर 179 जण जखमी

Odisha Train Accident News: कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरून घसरले.
Published on

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसली. या भीषण रेल्वे अपघातात तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळच्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

Odisha Train Accident
Ganesh Sugar Factory: गणेश कारखान्याचा वाद पेटला; भागीदारी तत्वावर चालवायला दिल्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन

कोरोमंडल एक्सप्रेस ही रेल्वे कोलकाता येथील हावडा स्थानकावरून चेन्नईला जात असताना ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे रुळावरुन घसरले. यामध्ये तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातानंतर प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. तसेच अपघातस्थळी बचाव कार्यासाठी अनेक पथके घटनास्थळी पाठवण्यात आली असून काही पथके तेथे पोहोचली आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून तातडीने मदत करण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com