Jyoti Waghmare : सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा, हातात संविधान... ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेतानाच थांबविले: राज्यसभेत काय घडलं?

Jyoti Waghmare Rajya Sabha, Oath controversy India Parliament : नवस न करता पावणारा देवमाणून म्हणून एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे. माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी रक्ताचे पाणी करीन, असे ज्योती वाघमारे शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या.
Jyoti Waghmare Rajya Sabha Oath
Jyoti Waghmare Rajya Sabha Oath Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha oath : राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांना आज सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, भाजपचे रामराव वडकुते व माया ईवनाते यांनी खासदारकीची शपथ घेतली.

शरद पवार हे राज्यसभेत व्हीलचेअरवर आले होते. व्हीलचेअरवर बसूनच त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. सर्वाधिक चर्चा झाली ती वाघमारे यांच्या शपथेची. त्या आज शपथ घेण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून आल्या होत्या. शपथ घेताना त्यांच्या हातात संविधान होते.

वाघमारे यांनी शपथ घेण्यास सुरूवात केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरूषांची नावे घेतली. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी मूळ शपथ घेण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांना राज्यसभेतील अधिकाऱ्यांनी लगेच थांबवून कुणाचेही नाव न घेता पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर वाघमारे यांनी पुन्हा शपथ घेतली. मात्र, यावेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही.

Jyoti Waghmare Rajya Sabha Oath
Jagdeep Dhankhar news : जगदीप धनखड यांनी चक्रं फिरवली अन् भाजपचा पराभव? तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकीय समीकरणं बदलली...

दरम्यान, मीडियाशी बोलताना वाघमारे म्हणाल्या, सावित्रीबाईंच्या आडव्या कुंकवाने अज्ञानाला आडवं केलं होतं आणि महिलांना गगनभरारी घेण्याचे बळ दिलं होतं. माझ्या कपाळावरील चंद्रकोर आणि नथ जिजाऊंना मानवंदना आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी इरकल साडी नेसून आणि कष्टकऱ्यांसारखी बनून मी सभागृहात गेले होते. कारण मी खासदार झाले असले तरी मला शोषित, वंचित, दलित, महिलांचा आवाज बनायचे आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha Oath
Baramati Bypoll : डाऊनफॉल सुरू! पार्थ पवारांचा काँग्रेसला सूचक इशारा

एकनाथ शिंदे यांनी एका भीमराज की बेटीला खासदार केले. देवालाही नवस करावा लागतो. पण नवस न करता पावणारा देवमाणून म्हणून एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे. माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी रक्ताचे पाणी करीन. कष्टकरी, गरिबांचा आवाज बनण्याचे काम मी राज्यसभेच्या प्रत्येक क्षणी करेन, अशी भावना वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com