Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारच्या काळातील प्रकरण भोवणार? हायकोर्टाकडून कारवाईवर शिक्कामोर्तब

Delhi High Court ruling : कॅटने समीर वानखेडे यांचे म्हणणे मान्य करत कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले होते. सरकारने वानखेडे यांच्याविरोधात द्वेषातून पक्षपाती पद्धतीने कारवाई केल्याचा ठपका कॅटने ठेवला होता.
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारच्या काळातील प्रकरण भोवणार? हायकोर्टाकडून कारवाईवर शिक्कामोर्तब
Sarkarnama
Published on
Updated on

CAT order quashed : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आर्य़न खान ड्रग्ज प्रकरण IRS समीर वानखेडे यांना भोवण्याची शक्यता आहे. केद्रीय प्रशासकीय लवादाने (CAT) वानखेडे यांच्याविरोधात सरकारने सुरू केलेली विभागीय शिस्तभंगाची कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. याप्रकरणी आज कोर्टाने निकाल दिला.

केंद्र सरकारच्या याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि अमित महाजन यांच्या खंडपीठाने कॅटने जानेवारी महिन्यात दिलेला आदेश रद्द ठरिवला. कॅटने आपल्या आदेशाद्वारे वानखेडे यांच्या विरोधात सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट अँड कस्टम्स (CBIC) ला कार्यवाही करण्यापासून रोखले होते.

CBIC कडून वानखेडे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये मुंबईत असताना २०२१ च्या हाय-प्रोफाइल कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज जप्ती प्रकरणात वानखेडे यांची महत्वाची भूमिका होती. त्यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते.

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारच्या काळातील प्रकरण भोवणार? हायकोर्टाकडून कारवाईवर शिक्कामोर्तब
Jagdeep Dhankhar : दाढीवाल्या लोकांना पाहिलं की..! जगदीप धनखड थेट बोलले, सगळेच चकित...

वानखेडे यांच्या भूमिकेबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तक्रारींची तपासणी करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने (SET) केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारे सीबीआयसीने कारवाई सुरू केली होती. त्याविरोधात वानखेडे यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती. प्राथमिक चौकशीचे निष्कर्ष औपचारिक शिस्तभंगाच्या कारवाईसाठी आधार म्हणून वापरले जाऊ शकत नाहीत, असा दावा वानखेडे यांनी कॅटसमोर केला होता. तसेच आपल्याविरोधातील आरोप मनमानी, कायदेशीरदृष्ट्या अस्थिर आणि द्वेषाने प्रेरित असल्याचेही वानखेडे यांनी म्हटले होते.

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारच्या काळातील प्रकरण भोवणार? हायकोर्टाकडून कारवाईवर शिक्कामोर्तब
Rajya Sabha election : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा; सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत नाव जाहीर...

कॅटने वानखेडे यांचे म्हणणे मान्य करत कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले होते. सरकारने वानखेडे यांच्याविरोधात द्वेषातून पक्षपाती पद्धतीने कारवाई केल्याचा ठपका कॅटने ठेवला होता. कॅटच्या या आदेशाविरोधात केंद्र सरकार आणि सीबीआयसीने हायकोर्टात धाव घेतली होती. लवादाने आपले अधिकारक्षेत्र ओलांडल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला होता. त्यावर हायकोर्टाने कॅटचा आदेश रद्द ठरविला. त्यामुळे वानखेडे यांच्याविरोधात कारवाई सुरू ठेवण्याचा सीबीआयसीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com