BJP-JDS Alliance News : भाजप-जेडीएसमध्ये कुरबुरी वाढल्या; कर्नाटकातील जागावाटपावरून नाराजी !

Karnataka Lok Sabha Seat Allocation news : भाजप-जेडीएसमध्ये युतीबाबत अजून कुठलाही निर्णय झाला नाही.
BJP-JDS Allince News
BJP-JDS Allince News Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. कर्नाटकातील लोकसभा जागांसाठी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) यांच्यात युती झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-जेडीएस यांच्यात लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात बंद दाराआड चर्चा सुरू असतानाच आणि ही चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आली. यामुळे जेडीएसने नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता भाजप-जेडीएसमध्ये राजकीय कुरबुरी वाढल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

BJP-JDS Allince News
INDIA Alliance : 'इंडिया आघाडी' जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ? शरद पवारांच्या घरी समन्वय समितीची बैठक !

कर्नाटकमधील लोकसभा जागावाटपावरची चर्चा भाजप व सेक्युलर जनता दल यांच्यात सुरू आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच ज्येष्ठ भाजप नेत्यांकडून जागावाटपाबाबत बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर माध्यमात आली. त्यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप-जेडीएसमध्ये युतीबाबत अजून कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याचे जेडीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

BJP-JDS Allince News
BJP State Teachers Alliance: भाजप प्रदेश शिक्षक आघाडीच्या संयोजकपदी प्रशम कोल्हे यांची नियुक्ती

कर्नाटक राज्यातील २८ लोकसभा जागांपैकी केवळ चार जागा भाजपने जेडीएसला दिल्याची चर्चा आहे. मात्र, या निव्वळ चर्चा असून आम्ही कुठलाही प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे स्पष्ट करीत सुरू असलेल्या चर्चेला जेडीएसने नकार दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही पक्षांंत युती होणार की नाही, याबाबत चर्चा घडून येत आहे.

दुसरीकडे जेडीएसने इंडिया आघाडीसोबत जाण्याचेही संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे आता जेडीएस नेमकी काय भूमिका घेणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

BJP-JDS Allince News
Nana Patole on Parliament Session : संसदेचे विशेष अधिवेशन कशासाठी ? मुंबई, विदर्भाबाबत पटोलेंकडून संशयाचा बॉम्ब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com