Trump Attack : गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच आले समोर; चेहऱ्यावर भीती, हल्लेखोराचं नाव घेत म्हणाले, "इराणचा..."

Donald Trump on White House Shooting Incident : "शनिवारी 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर'मध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या आणि एका व्यक्तीने सुरक्षा चौकीवर हल्ला केला. ज्यामध्ये एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला. या घटनेत एकच हल्लेखोर असावा असण्याची शक्यता असून अधिकचा तपास सुरू आहे."
Donald Trump addressing media after the White House shooting incident
US President Donald Trump addressing media after the White House shooting incident, confirming safety during the Trump attack.Sarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Attack : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन’च्या डिनर कार्यक्रमासाठी आले असता या कार्यक्रमात शनिवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबार झाला तेव्हा या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी वान्ससह उपस्थित होते.

या गोळीबाराच्या घटने दरम्यान सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे सर्वजण सुरक्षित असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. शिवाय हा हल्ला इराण आणि अमेरिकेतली युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाला नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत सर्व घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "शनिवारी 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर'मध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या आणि एका व्यक्तीने सुरक्षा चौकीवर हल्ला केला. ज्यामध्ये एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला. या घटनेत एकच हल्लेखोर असावा असण्याची शक्यता असून अधिकचा तपास सुरू आहे.

Donald Trump addressing media after the White House shooting incident
PM Modi on Trump Attack : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने PM मोदीही हादरले; काही मिनिटांतच दिली कडक शब्दात प्रतिक्रीया

तर यावेळी त्यांनी संशयिताला सुरक्षा दलांनी ताब्यात घेताना एक अधिकारी जखमी झाला असून आता त्याची प्रकृती बरी असल्याचंही सांगितलं. तरअमेरिकेत हिंसाचार घडवून आणण्यासाठी गेल्या दोन वर्षांत आपल्या लोकशाहीवर एखाद्या मारेकऱ्याने हत्येच्या उद्देशाने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

Donald Trump addressing media after the White House shooting incident
Harbhajan Singh Punjab news : भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेताच हरभजन सिंग यांना सरकारकडून पहिला झटका; काल घरावर गद्दार लिहिले अन् आज...

तसंच व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरचा कार्यक्रम पुढील ३० दिवसांच्या आत पुन्हा आयोजित केला जाईल आणि तो आधीपेक्षा चांगला आणि अधिक सुंदर असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, या गोळीबाराचा इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाशी काही संबंध आहे का? असं विचारलं असता ट्रम्प यांनी 'तसं वाटत नाही' असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव कोल थॉमस एलन असे असू तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याचंही सांगितलं. तसंच तो हल्ल्याच्या पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याच्याकडे घातक शस्त्र होती. तर हल्लेखोर एकटाच आला की, त्याच्यासोबत इतर कोणी होतं, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत असल्याचही ट्रम्प यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com