Donald Trump : मध्यावती निवडणुकीत पराभव होताच ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 'त्या' वक्तव्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं

US Midterm Results : अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मोठं यश मिळवलं. प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅट्सनी बहुमत मिळवलं आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अनेक जागा डेमोक्रॅट्सनी जिंकल्या, तर प्रतिनिधिगृहातही डेमोक्रॅट्सनी मोठी आघाडी घेतली.
Trump Election Defeat | US Midterm Results | Iran War
Trump Election Defeat | US Midterm Results | Iran WarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Trump election defeat : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रतिनिधिगृह आणि सिनेट या संसदेच्या दोन्ही सभागृहांवरील रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण संपुष्टात आले असून डेमोक्रॅटिक पक्षाने दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवलं आहे.

या निकालामुळे ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळातील राजकीय आव्हानं वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, इराणविरोधातील लष्करी कारवाई आणि त्यामुळे वाढलेल्या महागाईचा फटका रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत बसल्याचं बोललं जात आहे.

मात्र, दुसरीकडे निवडणुकीतील पराभवानंतरही ट्रम्प यांची इराणविरोधातील आक्रमक भूमिका कायम असून इराणविरोधात अमेरिकेकडून पुन्हा लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या मध्यपूर्वेतील परिस्थितीत पुन्हा संघर्ष भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला. ते म्हणाले की, "मला संपूर्ण इराण उद्ध्वस्त करायचा नाही, पण गरज पडल्यास मला ते करावं लागेल, तुम्हाला लवकरच समजेल". शिवाय, इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, "ते आमच्या मंजुरीशिवाय काहीही करत नाहीत." ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता असून या तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Trump Election Defeat | US Midterm Results | Iran War
Raju Shetti : अखेर राजू शेट्टींचं आंदोलन स्थगित! 3,900 रुपये पहिली उचल, नेमका फॉर्म्युला काय ठरला?

निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का

अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मोठं यश मिळवलं. प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅट्सनी बहुमत मिळवलं आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अनेक जागा डेमोक्रॅट्सनी जिंकल्या, तर प्रतिनिधिगृहातही डेमोक्रॅट्सनी मोठी आघाडी घेतली. त्यामुळे ट्रम्प यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या निर्णयांना संसदेतील विरोधाचा सामना करावा लागू शकतो.

Trump Election Defeat | US Midterm Results | Iran War
Sharad Pawar Health : मोठी बातमी! गौतम अदाणी शरद पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल

या निकालामागे ट्रम्प प्रशासनाची आर्थिक आणि परराष्ट्र धोरणं महत्त्वाची ठरल्याचं मानलं जात आहे. विशेषतः इराणविरोधातील युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आणि सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांवरील आर्थिक भार वाढला. निवडणुकीत मतदारांनी महागाई आणि युद्धाच्या मुद्द्यांवरून रिपब्लिकन पक्षाविरोधात मतदान केल्याचं विश्लेषण केलं जात आहे. ट्रम्प यांनीही निवडणुकीतील पराभवामागे इराण युद्धाचा वाटा असल्याचं मान्य केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.