EPFO Update 2026 : आजच उरकून घ्या PF ची कामे; तीन दिवस सर्व ऑनलाईन सेवा होणार ठप्प, जाणून घ्या सविस्तर माहिती...

EPFO Services Unavailable, EPFO Member Portal : सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्याचे पासबुक किंवा शिल्लक पाहता येणार नाही. ऑनलाइन क्लेम सादर करता येणार नाही.
EPFO Services Unavailable
EPFO Services UnavailableSarkarnama
Published on
Updated on

EPFO System Migration : कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) ऑनलाईन सेवांबाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस EPFO चे अधिकृत पोर्टल तसेच उमंग अॅप बंद राहणार असून या काळात ऑनलाईन सेवा ठप्प राहणार आहेत. त्यामुळे सदस्यांना नवीन क्लेम करता येणार नाही. त्याचप्रमाणे जुन्या क्लेमची प्रक्रिया थांबणार आहे.

नेमकं कारण काय?

EPFO कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोर्टलचे अद्ययावतीकरण केले जामार आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक देखभाल आणि ऑनलाईन सेवा अधिक सक्षम करण्यासाठीचे काम हाती घेण्यात येणार आहे. क्लेम प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल तसेच ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी पोर्टल बंद ठेवले जाणार आहे. परिणामी सर्व ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद असतील.

कधी सुरू होणार पोर्टल?

EPFO पोर्टल शुक्रवारी ता. २६ जूनला मध्यरात्री १२ वाजता बंद होईल. रविवारी ता. २९ जूनला रात्री ११.५९ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. त्यामुळे सोमवार ता. ३० जून रोजी पोर्टल सुरू होईल. त्यानंतर सदस्यांना ऑललाईन सेवांचा वापर करता येऊ शकतो. या काळात मदतीसाठी ईपीएफओकडून १४४७९ हा कॉल सेंटरचा क्रमांक जाहीर केला आहे.

EPFO Services Unavailable
Political Viral Video : फोडाफोडीच्या राजकारणात सुखावणारी घटना; पक्षाचे दोन तुकडे, अखेर माजी केंद्रीय मंत्री असलेल्या लेकानं धरले बापाचे पाय, दोघेही ढसाढसा रडले...

कोणत्या सेवा बंद राहणार?

सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्याचे पासबुक किंवा शिल्लक पाहता येणार नाही. ऑनलाइन क्लेम सादर करता येणार नाही. UAN संबंधित सेवा म्हणजेच UAN activation, KYC अपडेट, पासवर्ड बदल अशा सुविधा बंद राहतील. कंपन्यांना कर्मचारी योगदानाशी संबंधित ऑनलाईन प्रक्रियाही करता येणार नाही.

EPFO Services Unavailable
BJP Councillors Oath : हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; भाजपच्या 20 नगरसेवकांची शपथ ठरविली अवैध, देशभरातील 'पॅटर्न' बदलणार?

सदस्यांसाठी महत्वाचे

पोर्टल पुढील तीन दिवस बंद राहणार असल्याने PF withdrawal किंवा क्लम करायचा असल्यास त्यासाठी पुढचे काही तासच उरले आहेत. पोर्टल बंद होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवायसी किंवा इतर महत्वाची कामे तातडीने करून घ्यावीत. देशभरातील कोट्यवधी EPFO सदस्य, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक पोर्टल बंद राहणार असल्याने त्याचा फटका बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com