Government Subsidy: अखेर कृषीमंत्री आले जागेवर! कोट्यवधींची शासनाची सबसिडी केली परत; स्वतः सरकारनं दिली माहिती

Government Subsidy: केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी काकडीच्या शेतीसाठी सरकारकडून तब्बल ९९ लाख रुपयांची सबसिडी पदरात पाडून घेतली होती. स्वतःच्याच मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या एका योजनेंतर्गत ही सबसीडी त्यांना मिळाली होती.
Government Subsidy: अखेर कृषीमंत्री आले जागेवर! कोट्यवधींची शासनाची सबसिडी केली परत; स्वतः सरकारनं दिली माहिती
Published on
Updated on

Government Subsidy: केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी आपल्याच मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणाऱ्या एका योजनेंतर्गत मिळणारी सबसिडी आपल्या पदरात पाडून घेतली होती. पण मीडियानं याचा भांडाफोड केल्यानंतर हे मंत्रीमहोदय जागेवर आले असून त्यांनी ही संपूर्ण सबसिडी सरकारला परत केली आहे. स्वतः मोदी सरकारनं लोकसभेत ही माहिती दिली.

Government Subsidy: अखेर कृषीमंत्री आले जागेवर! कोट्यवधींची शासनाची सबसिडी केली परत; स्वतः सरकारनं दिली माहिती
Supreme Court: "अटक केलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करा..."; सीजेपीच्या आंदोलनावर सरन्यायाधीशांचा दिल्ली पोलिसांना इशारा

सबसिडी संदर्भात तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितलं की, भागीरथ चौधरी यांनी सांगितलं आहे की, त्यांनी योजनेंतर्गत मिळवलेली सबसिडीची रक्कम संबंधित बँकेला परत केली आहे. संबंधित बँकेला निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी सबसिडीची किंमत एनएचबीला (राष्ट्रीय बागवानी बोर्ड) परत करावी. ठाकूर यांनी साभागृत सांगितलं की, भागीरथ चौधरी यांच्याशिवाय राजस्थानचे जालोर येथील भाजप खासदार लुंबारम चौधरी यांना गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या अंतर्गतच आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.

Government Subsidy: अखेर कृषीमंत्री आले जागेवर! कोट्यवधींची शासनाची सबसिडी केली परत; स्वतः सरकारनं दिली माहिती
Congress Clash : काँग्रेसच्या बैठकीतच कार्यकर्ते भिडले, वादावादीचे रूपांतर हाणामारीत; व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल

MIDH योजनेंतर्गत मिळाली सबसिडी

भागीरथ चौधरी यांना मिशन फॉर इंटीग्रेडेट डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिककल्चर (MIDH) योजनेंतर्गत सबसिडी मिळाली होती. या योजनेचा हेतू मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक शेतीला प्रोत्साहन देणं हा होता. या योजनेचं संचालन एनएचबीद्वारे केलं जातं. तसंच हे बोर्ड भागीरथ चौधरी यांच्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात आहे. या योजनेंतर्गत शिमला मिरची, काकडी, टोमॅटो आणि आठ प्रकारच्या फुलांच्या शेतीसाठी जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. केंद्रीय राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांच्या शेतीचा प्रकल्प १६,५९२ स्क्वेअर मीटर इतक्या भागावर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com