Jammu and Kashmir: फारुख अब्दुल्ला यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले, 'शेजारचा पाकिस्तान काश्मीरला वाचवत आहे, अन्यथा, मोदी सरकारचा...'

Jammu Kashmir News: फारुख अब्दुल्ला यांनी यापू्र्वीही पाकिस्तानचे गोडवे गायल्याचं पाहायला मिळालं आहे.त्यांची शेजारील देशासोबत संवाद साधण्याची भूमिका तसेच यापूर्वी मांडलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राजकीय वाद निर्माण झाले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा थेट केंद्र सरकारच्या संवादाबाबतच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी लोकांना आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले.
National Conference President Farooq Abdullah
National Conference President Farooq AbdullahSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी (ता.24 ऑक्टोबर) काश्मीरबाबत वादग्रस्त विधान करतानाच केंद्रातील मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीतील एनडीए सरकार जम्मू काश्मीर प्रदेशातील जनतेला मदत करू शकत नसल्याचा धक्कादायक दावा फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.

फारुख अब्दुल्ला बारामुल्ला येथे नॅशनल कॉन्फरन्सचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्य वादाला तोंड फुटलं आहे. ते म्हणाले, “आपल्या शेजारील (पाकिस्तान) देशाकडे पाहा.तो प्रत्येक व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे. तो आपल्याला वाचवत आहे; अन्यथा आपल्या सरकारचे हेतू योग्य नाहीत ,असं वादग्रस्त विधान केलं आहे. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळासह देश पातळीवरील अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून अब्दुल्ला यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

फारुख अब्दुल्ला यांनी यापू्र्वीही पाकिस्तानचे गोडवे गायल्याचं पाहायला मिळालं आहे.त्यांची शेजारील देशासोबत संवाद साधण्याची भूमिका तसेच यापूर्वी मांडलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राजकीय वाद निर्माण झाले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा थेट केंद्र सरकारच्या संवादाबाबतच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी लोकांना आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले.

जम्मू काश्मीरमधील लोकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला नाही,तर त्यांची ओळख पुसली जाण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच केंद्र सरकार मोठमोठे दावे करते आणि संवादाबद्दल बोलते. पण दिल्लीकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवू शकता?त्यांच्याविरोधात उभे राहा. तुम्ही तसे केले नाही, तर आपली ओळख पुसली जाईल, असे ते म्हणाले.

National Conference President Farooq Abdullah
Uttar Pradesh Election: लोकसभेच्या 'सेमी फायनल'साठी 'नो रिस्क'; तावडेंचा सर्व्हे अन् भाजपमध्ये अस्वस्थता; अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट?

फारूख अब्दुल्ला म्हणाले, स्वाभिमानाने जगायचे असेल,तर स्वतःच्या पायावर उभे राहा.जोपर्यंत लोक स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत, तोपर्यंत त्यांना सन्मान मिळणार नाही.माझे हे शब्द लक्षात ठेवा.स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्या परमेश्वराचे स्मरण करा आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चाला.तीच खरी शक्ती आहे; दुसरी कोणतीही शक्ती नाही नसल्याचं त्यांनी बारामुल्ला येथे बोलताना म्हटलं.

राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांना आपण पाहिले असून, त्यांच्याकडून जनतेवर अत्याचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकांनी एकजूट राखण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही साध्य करता येणार नसल्याचा उच्चारही फारुख अब्दुल्ला यांनी केला.

National Conference President Farooq Abdullah
IAS Transfer News: सरकारकडून प्रशासनात मोठे फेरबदल; जिल्हाधिकारीसह विविध मोठ्या पदांवरील तब्बल 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या वाढत्या संख्येवरही त्यांनी टीका केली. राजकारणात पैशांचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत काही लोक आर्थिक फायद्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.तसे फारुख अब्दुल्ला यांनी भाजपशासित राज्यांमध्ये होत असलेल्या पाडकामाच्या कारवायांवरही टीका केली.

ते म्हणाले, देशाच्या इतर भागांत, जिथे भाजपचे सरकार आहे, तिथे लोकांच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवले जात आहेत आणि दुकाने पाडली जात आहेत. हे सर्व तुम्हाला दिसत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजप अन् हिंदुत्त्ववादी संघटनांचा संताप

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान काश्मीरला वाचवत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि विश्व हिंदू परिषदसह इतर विविध हिंदुत्त्ववादी संघटनांकडून यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी फारुख अब्दुल्ला यांची पाकिस्तानबद्दलची सहानुभूती वेळोवेळी समोर येत असल्याचा आरोप केला आहे. तसेच जेव्हा त्यांच्यातील पाकिस्तानप्रेम उफाळून येते, तेव्हा ते अशी बेजबाबदार वक्तव्ये करत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला आहे.

तर विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनीही फारुख अब्दुल्ला यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढला आहे. ते म्हणाले, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील,असं ठणकावलं आहे. तसेच अब्दुल्ला भारतात राहतात, पण पाकिस्तानची स्तुती करतात. पाकिस्तानमुळे काश्मीर सुरक्षित आहे की भारताच्या सामर्थ्यामुळे पाकिस्तान नियंत्रणात राहतो म्हणून काश्मीर सुरक्षित आहे? जर त्यांचा म्हणण्याचा अर्थ हाच असेल, तर देशद्रोहाचे यापेक्षा मोठे कृत्य दुसरे कोणतेही असू शकत नसल्याची टीका बन्सल यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com