Rajiv Kumar news : लोकसभेची 2024 ची निवडणूक पार पाडली, आता माजी निवडणूक आयुक्तांच्या खांद्यावर आली मोठ्या बँकेची जबाबदारी

HDFC Bank chairman appointment : एचडीएफसी बँकेचे माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी मार्च महिन्यातच तडकाफडकी या पदाचा राजीनामा दिला होता.
Rajiv Kumar
Rajiv KumarSarkarnama
Published on
Updated on

HDFC Bank news : देशाचे माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आता मोठ्या खासगी बँकेची जबाबदारी आली आहे. HDFC बँकेकडून त्यांची सोमवारी अध्य़क्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या नियामक मंडळाकडून राजीव कुमार यांची चार वर्षांसाठी इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून नियुक्तीस मंजुरी दिली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळण्यावर ही नियुक्ती अवलंबून असल्याचेही HDFC बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर राजीव यांना अंशकालीन अध्यक्ष नियुक्त केले जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीवर ही नियुक्ती अवलंबून असणार आहे. आरबीआयच्या मंजुरीनंतर त्याच दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एचडीएफसी बँकेचे माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी मार्च महिन्यातच तडकाफडकी या पदाचा राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या मुद्दयावर त्यांनी हे पद सोडले होते. त्यानंतर आता त्यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे माजी केंद्रीय अर्थ सचिवही होते. काही वित्तीय संस्थांमध्येही त्यांनी यापूर्वी काम केले आहे.

Rajiv Kumar
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; सर्वात विश्वासू आमदाराला फोडले, थेट उपसभापती पदासाठी भरला अर्ज

राजीव कुमार हे देशाचे २५ वे निवडणूक आयुक्त होते. ते १९८४ च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत. २०१७ ते २०२० या कालावधीत ते वित्तीय सेवा विभागाचे सचिव होते. निवडणूक आयुक्त असताना त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतरची पहिली विधानसभेची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.

Rajiv Kumar
Tamil Nadu political news : आमदारांचे धडाधड राजीनामे अन् सर्वच मित्रपक्ष सत्तेत; मातब्बर विरोधकांना जोरदार झटके...

दरम्यान, राजीव कुमार यांनी बँकेच्या प्रत्येक मिटींगसाठी सुमारे एक लाख रुपये मानधन मिळणार आहे. कार, घर, प्रवास, हॉटेल याचा संपूर्ण खर्च बँकेकडून उचलला जाईल, असे मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. राजीव कुमार यांच्या नियुक्तीवरून आता राजकारणही तापू लागले आहे. विरोधी पक्षांनी या नियुक्तीवरून टीका सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com