Delhi Security Alert: देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच 'राजधानी'त खळबळ; हायकोर्टासह 6 ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी

New Delhi Bomb Blast Threat News: देशाची राजधानी दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त सुरक्षेसाठी सुमारे 15000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच व्हीआयपी मान्यवरांची वर्दळ असल्याकारणानं ऐतिहासिक लालकिल्ला परिसरात पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांचा मोठा पहारा ठेवण्यात आला आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
Delhi Bomb Threat
Delhi Bomb ThreatSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: एकीकडे देशभरात सध्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान, देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. 15 ऑगस्टच्या निमित्तानं सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिस, सुरक्षा दले यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच आता दिल्ली हायकोर्टासह राजधानीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

दिल्ली हायकोर्टासह देशाची राजधानीतील सहा प्रमुख ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी मेलद्वारे मिळाली आहे. या मेलनंतर देशाच्या सुरक्षा व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहे. तसेच हा मेल समोर आल्यानंतर दिल्ली हायकोर्ट आणि परिसरात बॉम्बविरोधी पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून संबंधित स्थळी कसून तपासणी केली जात आहे.

दिल्ली हायकोर्टाला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये उच्च न्यायालयचं नव्हे,तर जामनगर हाऊस, झंडेवालानची फ्लॅटेड इमारत, एमबी साकेतमधील डीएम कार्यालय, आयजीआय एअरपोर्टचं टर्मिनल-3 आणि दिल्ली कँटचं एसडीएम कार्यालयही उडवून देण्याचा उल्लेख आहे.

दिल्ली उच्च न्यायालयासह संबंधित सहाही ठिकाणी बॉम्बविरोधी,सुरक्षा पथके आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. हायकोर्टाच्या धमकीच्या मेलमध्ये संबंधित ठिकाणी आता आणखी कडक बंदोबस्त तैनात करण्यात सुरुवात झाली आहे. परंतू, धमकीच्या मेलनंतर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासाअंती त्यांच्याहाती संशयास्पद असं काहीही लागलं नसल्याचं दिसून आलं आहे.

Delhi Bomb Threat
Beed News: पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यापूर्वीच बीडमधून हादरवणारी अपडेट, हत्या झालेल्या विलास घुलेंच्या पत्नीनं विषारी औषध प्राशन केलं

देश तसेच राज्य पातळीवरील महत्त्वाच्या असा सर्वच ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या धर्तीवर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिस तसेच सुरक्षा यंंत्रणांकडून पेट्रोलिंगही केले जात आहे. बारीकसारीक अशा सर्वच पातळीवरील संशयास्पद हालचालींवर संबंधित यंंत्रणा कडक वॉच ठेवून असल्याचीही माहिती समोर येत आहे.

यंदाच्या सोहळ्यात राष्ट्रगीतानंतर पहिल्यांदाच 'वंदे मातरम्' गीताचे औपचारिक गायन ही विशेष ऐतिहासिक घडामोड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात येत आहे.

Delhi Bomb Threat
Girish Mahajan : रायगडमध्ये तटकरेंकडून कॉम्प्रमाईज, नाशिकमध्ये गिरीश महाजनांचा दबदबा कायम... भुजबळ-भुसेंच्या तलवारी म्यान

'वंदे मातरम्'च्या 150 वर्षपूर्तीनिमित्त लालकिल्ल्यावर प्रथमच राष्ट्रगीतासोबत राष्ट्रगीत 'वंदे मातरम्'चा गजर होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या यंदाचा सोहळ्याला 'युवा शक्ती' आणि 'विकसित भारत 2047' या संकल्पनेवर आधारित आहे. यात विविध क्षेत्रांतील जवळपास 5000 विशेष पाहुणे आणि युवा सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

देशाची राजधानी दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त सुरक्षेसाठी सुमारे 15000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच व्हीआयपी मान्यवरांची वर्दळ असल्याकारणानं ऐतिहासिक लालकिल्ला परिसरात पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांचा मोठा पहारा ठेवण्यात आला आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com