CJP X handle controversy : 'कॉक्रोच जनता पार्टी'ला पहिला धक्का सरकारी आदेशानेच? IB च्या इशाऱ्यानंतर दिले होते अकाऊंट बंद करण्याचे आदेश

IB warning social media account India : ‘कॉकरोच जनता पार्टी’ या X हँडलविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याच्या IB च्या अहवालानंतर अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Cockroach janta party
Cockroach janta partySarkarnama
Published on
Updated on

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील ‘कॉकरोच जनता पार्टी’ या हँडलवर मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर हे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले असून, या निर्णयामागे गुप्तचर विभागाच्या (Intelligence Bureau) अहवालाचा आधार असल्याची माहिती समोर आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69(A) अंतर्गत ‘X’ कंपनीला हे अकाउंट रोखण्याचे आदेश दिले. गुप्तचर विभागाने या अकाउंटवरून भडकाऊ स्वरूपाचे पोस्ट टाकले जात असल्याचा दावा केला आहे.

Cockroach janta party
CJP Symbol Election Rule: कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना तर झाली, पण झुरळ चिन्ह मिळणार? काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम?

त्याचा परिणाम देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या अकाउंटला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सरकारची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे.

हे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले असले तरी परदेशातून ते अद्याप पाहता येत आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत या हँडलचे 2,00,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स होते. याच्याशी संबंधित इंस्टाग्राम अकाउंटवरही 16 million पेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याची माहिती आहे. सरकारकडून त्या अकाउंटवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Cockroach janta party
Congress news : विधानसभा निवडणुकीनंतर आता देशातील 10 राज्यांतील आमदारांचा 'भाव' वाढला; काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवणार

‘कॉकरोच जनता पार्टी’ हे हँडल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर चर्चेत आले होते. त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी हे हँडल सुरू केले. अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर त्यांनी नवीन हँडल सुरू केल्याची माहितीही सोशल मीडियावरून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com