CJP Symbol Election Rule: कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना तर झाली, पण झुरळ चिन्ह मिळणार? काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम?

How political parties get election symbols in India : कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेनंतर आता ‘झुरळ’ चिन्ह मिळणार का याची चर्चा रंगली आहे. पक्षांना निवडणूक चिन्ह देताना निवडणूक आयोगाचे नियम काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.
Cockroach Janata Party election symbol rule
Cockroach Janata Party election symbol ruleSarkarnama
Published on
Updated on

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत “कॉकरोच जनता पार्टी” म्हणजेच CJPची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वी ही पार्टी ऑनलाइन सुरू करण्यात आली. अभिजीत दिपके नावाच्या व्यक्तीने अमेरिकेतील बोस्टन शहरातून तिची स्थापना केली आहे. सरकारविरोधी भूमिका आणि विनोदी शैलीमुळे ही पार्टी अल्पावधीतच व्हायरल झाली. इन्स्टाग्रामवर या पक्षाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेकांनी त्याला समर्थन दिलं आहे. मात्र, आता या पक्षाला निवडणूक लढवायची असल्यास मोठे कायदेशीर अडथळे समोर येऊ शकतात.

भारतात कोणत्याही पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या सेक्शन 29A अंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतरच पक्षाला निवडणूक चिन्हासाठी अर्ज करता येतो. देशात निवडणूक चिन्हांचे दोन प्रकार असतात. मोठ्या आणि मान्यताप्राप्त पक्षांना राखीव चिन्ह दिलं जातं, तर नवीन किंवा छोट्या पक्षांना “मुक्त चिन्ह” दिलं जातं.

Cockroach Janata Party election symbol rule
Vivek Kolhe : ‘कोल्हे आमदार होईपर्यंत चप्पल नाही’; 6 वर्षे अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्याची शिर्डीत भावनिक संकल्पपूर्ती

CJPने “झुरळ” हे निवडणूक चिन्ह मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या 1968 च्या नियमांनुसार नवीन चिन्ह कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्यासारखं असू शकत नाही. त्यामुळे झुरळ हे प्राण्यांच्या श्रेणीत येत असल्याने हे चिन्ह मिळणं कठीण मानलं जात आहे. 1991 पासून हा नियम लागू करण्यात आला होता. प्रचारादरम्यान प्राण्यांचा गैरवापर होऊ नये, यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला होता.

याशिवाय CJPने मोबाईल फोन चिन्हाचीही मागणी केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीत मोबाईल फोनचा समावेश नाही. त्यामुळे हा पर्यायही पक्षासाठी अवघड ठरू शकतो. सध्या CJP सोशल मीडियावर चर्चेत असली तरी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिला अनेक नियम आणि प्रक्रियांना सामोरं जावं लागणार आहे.

Cockroach Janata Party election symbol rule
EC Press Conference : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मतदार यादीत घोळ? 'मविआ'च्या 'त्या' 32 हरकतींना मिळणार उत्तर

आता त्यातच अभिजीत दीपके यांच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजीतचे वडील भगवान दीपके म्हणाले की, “अभिजीतने राजकारणात जाऊ नये, ही चळवळ थांबवावी असं आम्हाला वाटतं. प्रसिद्धीमुळे भीती वाटते. अटक करतील का, उचलून नेतील का अशी चिंता सतावत आहे.” त्यांच्या आईलाही गेल्या दोन दिवसांपासून झोप लागलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

आता सोशल मीडियावर चर्चेत असलेली CJP प्रत्यक्ष राजकारणात उतरणार का आणि अभिजीत दीपके आपल्या कुटुंबाचा सल्ला मानणार की तरुणांच्या असंतोषाचं नेतृत्व करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com