Sukhoi-30MKI Crash : देश हादरला! रडारवरून अचानक गायब झालेलं हवाई दलाचं सुखोई-30 लढाऊ विमान कोसळलं; दोन्ही वैमानिकांचा मृत्यू

Sukhoi-30MKI Crash in Assam : गुरुवारी संध्याकाळी सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच रडारशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्यासाठी काह पथके रवाना करण्यात आली होती.
Sukhoi-30MKI fighter jet crash in Assam
Wreckage of the Sukhoi-30MKI fighter jet crash in Assam after the aircraft lost radar contact near Jorhat, resulting in the death of two Indian Air Force pilots.Sarkarnama
Published on
Updated on

Sukhoi-30MKI Crash in Assam : भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान आसामध्ये बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. तर आता हे बेपत्ता झालेले विमान कोसळले असून यामध्ये स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

गुरुवारी संध्याकाळी सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच रडारशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्यासाठी काह पथके रवाना करण्यात आली होती.

मात्र, आता या बेपत्ता विमानाचा मोठा अपघात झाला असून हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली.

Sukhoi-30MKI fighter jet crash in Assam
Governor Appointments India : राष्ट्रपतींकडून देशभरात मोठे फेरबदल! महाराष्ट्र, बिहार अन् पश्चिम बंगालसह 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर

या विमानात असलेल्या स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचा मृत्यू झाल्याचंही भारतीय हवाई दलाने एक्सवर पोस्ट करत सांगितलं. तर हवाई दलाने एक्सवरील पोस्टमध्ये स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

शिवाय भारतीय हवाई दलाचे सर्व कर्मचारी या दुःखाच्या वेळी मृतांच्या कुटुंबासोबत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सुखोई एसयू-30 एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते.

Sukhoi-30MKI fighter jet crash in Assam
Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत मोठी बातमी! लाखो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप : आंदोलकांवरील गुन्हे मागे, वारसांना नोकरी अन् 10 लाखांची आर्थिक मदत...

2 आसनी हे लढाऊ विमान ट्विनजेट 4.5 क्षमतेचं आहे. सुखोई-30 एमकेआयची 3000 किमी रेंज असून त्याच्यात ब्रह्मोस देखील डागण्याची क्षमता आहे. मात्र, मागील 12 वर्षात आठ वेळा हे विमान कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com