Ivanka Trump Assassination Plot : अमेरिकेत खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा कट उघड

Donald Trump daughter Ivanka Trump assassination plot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या IRGCवर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Donald Trump daughter Ivanka Trump assassination plot
Donald Trump daughter Ivanka Trump assassination plotSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा एक धक्कादायक कट उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी इराकमधील एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहेय त्याने ट्रम्प यांची ज्येष्ठ कन्या इवांका ट्रम्प (Ivanka Trump) यांच्या हत्येचा कट आखल्याचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो इराकचा नागरिक आहे. तपास यंत्रणांच्या मते, तो इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) शी संबंधित घटकांच्या प्रभावाखाली होता. अमेरिकन तपास संस्थांनी त्याच्याकडून काही महत्त्वाचे दस्ताऐवज आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.

Donald Trump daughter Ivanka Trump assassination plot
Sunil Shelke News: सुनील शेळकेंना मिळणार ‘लाल दिवा’; कोणते खाते मिळणार?

या प्रकरणाचा संबंध इराणचे माजी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांच्या हत्येशी जोडला जात आहे. 2020 मध्ये बगदाद येथे अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. त्या कारवाईचे आदेश तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.

Donald Trump daughter Ivanka Trump assassination plot
Pune Police News: जो गुन्हा केलाच नाही, त्यात शरद पवारांच्या नेत्याला अटक! पुणे पोलिसांच्या कारभारावर सवाल

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी अल-सादी हा सुलेमानी यांना आपला गुरु मानत होता आणि त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ट्रम्प कुटुंबाला लक्ष्य करण्याच्या तयारीत होता. विशेषतः इवांका ट्रम्प यांच्याविरोधात त्याने कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरक्षा यंत्रणांना त्याच्याकडून फ्लोरिडामधील इवांका ट्रम्प यांच्या निवासस्थानाशी संबंधित काही नकाशे आणि माहिती मिळाल्याचे वृत्त आहे.

Donald Trump daughter Ivanka Trump assassination plot
Anganwadi Workers News: अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा! 45 वर्षांवरील महिलांनाही मिळणार पदोन्नती

अमेरिकन सुरक्षा संस्थांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीरपणे घेतले आहे. ट्रम्प कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे अमेरिका-इराण संबंधांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com