Yashwant Varma Resigns : न्यायाधीश यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा, 'कॅश कांड'मुळे होते चर्चेत!

Yashwant Varma Cash Scandal : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्याची तयारी संसदेत करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच कॅश कांडमुळे चर्चेत असलेले न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला आहे.
Justice Yashwant Varma Resigns
Justice Yashwant Varma Resignssarkarnama
Published on
Updated on

Yashwant Varma News : 'कॅश कांड'मुळे चर्चेत असलेले न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा त्यांनी गुरुवारी (ता.9) राष्ट्रपतींना सादर केला. मी अत्यंत दुःखाने माझा राजीनामा देत आहे, असे त्यांनी त्यांच्या राजीनामापत्रात म्हटले आहे.

यशवंत वर्मा हे दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश होते. तेव्हा 14 मार्च 2025 रोजी त्यांच्या घरी आग लागल्यानंतर अग्नीशमनच्या गाड्या आल्या होता. अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांना वर्मा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पोत्यात भरलेल्या सापडली. तसेच अर्धवट जळालेल्या नोटा देखील सापडल्या होत्या.

वर्मा यांच्या घरी रोख रक्कम सापडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना या संदर्भात इन हाऊस एक समिती बनवली होती. या समितीने आपला अहवाल सादर करताना वर्मा यांना पदावरून हटवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टातून त्यांनी बदली अलाहाबाद हायकोर्टात करण्यात आली होती.

Justice Yashwant Varma Resigns
Assembly Election: उपमुख्यमंत्रीपदासाठी तब्बल १,००० कोटींची ऑफर! भाजप कनेक्शन आलं समोर

महाभियोगाची तयारी...

वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची तयारी संसदेत करण्यात आली होती. लोकसभेमध्ये 146 खासदारांनी महाभियोगाच्या प्रस्तावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी वर्मा यांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती देखील स्थापन केली होती. मात्र, कारवाई पूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

Justice Yashwant Varma Resigns
Jyotiraditya Scindia : महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळा प्रकरण; थेट ज्योतिरादित्य शिंदेंनी घातलंय लक्ष... म्हणाले, प्रकरण CBI कडे, तडजोड न करता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com