murder case : भाजप आमदार अडचणीत! हत्या प्रकरणात लूकआऊट नोटीस, जामीन फेटाळला अन् कधीही अटक?

karnataka bjp mla bharati basavaraj : कुख्यात गुंड बिकलू शिव हत्या प्रकरणाशी संबंधित भाजपचे आमदाराच्या अडचणीत भर पडली असून त्यांना उच्च न्यायालयाने धक्का देत अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला आहे.
karnataka bjp mla bharati basavaraj
karnataka bjp mla bharati basavarajsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बिकलू शिव हत्या प्रकरणात भाजप आमदार भैरती बसवराज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला.

  2. यापूर्वी सत्र न्यायालयानेही त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

  3. CID कडून त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

karnataka political crime news : कुख्यात गुंड बिकलू शिव हत्या प्रकरणाशी संबंधित भाजपचे आमदार भैरती बसवराज यांना मंगळवारी (ता. १०) कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयाने नकार दिल्याने मोठा झटका बसला आहे. तसेच खंडपीठाने हा अर्ज फेटाळत ‘लूकआऊट नोटीस’ही जारी केली आहे. यामुळे आता त्यांना कधीही अटक होऊ शकते.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात भारतीनगर परिसरात गुंड बिकलू शिव याची शस्त्रसज्ज हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली होती. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. एफआयआरमध्ये बसवराज यांना पाचवे आरोपी म्हणून नमूद केले आहे. मृताच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून बेंगळुरूमधील भारतीनगर पोलिसांनी भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. गँगस्टर जगदीश पद्मनाभ ऊर्फ जग (वय ४५) याला मुख्य आरोपी म्हटले आहे.

आता याच प्रकरणात बसवराज यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. ज्यात न्यायमूर्ती सुनील दत्त यादव यांच्या खंडपीठाने जामीन देण्यास नकार देत अर्ज फेटाळला. दरम्यान यापूर्वी सत्र न्यायालयानेही त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर ते अद्यापही पसार आहेत. पण आता या आदेशानंतर त्यांना सीआयडीकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात ‘लूकआऊट नोटीस’ही जारी करण्यात आली आहे.

karnataka bjp mla bharati basavaraj
Baba Siddique Murder Case : ‘ऑर्डर फ्रॉम बिश्नोई’, बाबा सिद्दीकींवर गोळीबार; 27 आरोपींवर आरोपनिश्चिती, सलमान कनेक्शन चर्चेत

न्यायमूर्ती सुनील दत्त यादव यांनी जामीन देण्यास नकार देत अर्ज फेटाळत यापूर्वी दिलेले अटकेपासूनचे अंतरिम संरक्षणही मागे घेतले आहे. तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या सूत्रांनुसार, बसवराज यांचा शोध सीआयडी घेत असून विशेष पथके तयार केली आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बसवराज यांचे कुख्यात गुन्हेगार जगदीश उर्फ ​​जग्गाशी थेट संबंध होते आणि हत्येपूर्वी त्यांनी अनेक वेळा बिकलू शिवाची भेट घेतली होती. धक्कादायक म्हणजे बसवराज पूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे मानले जात होते. परंतु नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपली वाट वेगळी धरली होती.

karnataka bjp mla bharati basavaraj
Khopoli murder case : काळोखेंच्या मुली अटक करा म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पोलिस कोठडी, २३ दिवसांपासून होता फरार

FAQs :

1. भैरती बसवराज कोण आहेत?
ते कर्नाटकातील भाजपचे आमदार असून बिकलू शिव हत्या प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले गेले आहे.

2. उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने त्यांना दिलासा नाकारला.

3. यापूर्वी कोणत्या न्यायालयाने जामीन नाकारला होता?
सत्र न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता.

4. CID ने कोणती कारवाई केली आहे?
बसवराज यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

5. पुढे काय होऊ शकते?
CID कडून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com