Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतरही नाराजी कायम, विद्यमान मंत्री राजीनामा देणार? बालकृष्णांचे संकेत

Karnataka Congress Crisis : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली आहे. मुख्यमंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने बड्या नेता अद्याप नाराज असल्याची चर्चा आहे.
Cabinet Expansion
Cabinet ExpansionSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कर्नाटक काँग्रेसमध्ये नाराजी अद्याप कमी झालेली नाही. विजयनगर मतदारसंघाचे आमदार एम. कृष्णाप्पा यांनी आपल्याला मंत्रिपद द्यावे, अशी ठाम भूमिका घेतली असून, पक्ष नेतृत्वाच्या समजुतीचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहेत. अशातच मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनादेखील आता खातेवाटपाचे वेध लागले असून, याबाबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिवकुमार यांनी, नव्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत वेळ असून, त्यात कोणताही विलंब झालेला नाही, असे म्हटले आहे. तर कृष्णाप्पा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी नवनियुक्त मंत्री एच. सी. बालकृष्ण यांनी पक्षाच्या निर्णयासाठी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

रखडलेल्या खातेवाटपावर मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. १३ ऑगस्टला शोकप्रस्ताव मांडले जातील, तर १४ ऑगस्ट रोजी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला जाईल. बसवराज होरट्टी यांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले की, ‘होरट्टी यांनी स्वतः राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सहमती दर्शविल्यास त्यांचीच हंगामी सभापती (प्रोटेम चेअरमन) म्हणून नियुक्ती करू. त्यांच्या पदाचा आम्ही आदर करतो.

Cabinet Expansion
Cabinet Expansion : काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर बंडाचे वारे; बस रोखल्या, टायर जाळले, 19 नगरसेवकांचे राजीनामे

त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सभापतींना राजीनामा देण्यास सांगितल्याबद्दल भाजपने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘हा आमचा आणि होरट्टी यांच्यातील अंतर्गत विषय आहे. सदस्यांनी त्यांना सन्मानपूर्वक कृतज्ञता व्यक्त करावी, अशी आमची भूमिका आहे.’

विजयनगर मतदारसंघाचे आमदार एम. कृष्णाप्पा यांनी आपल्याला मंत्रिपद द्यावे, अशी ठाम भूमिका घेतली असून, पक्ष नेतृत्वाच्या समजुतीचे प्रयत्न अद्याप निष्फळ ठरत आहेत. कृष्णाप्पा यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिवकुमार, कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला तसेच प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. मात्र, विविध पदांची ऑफर देऊनही कृष्णाप्पा यांनी ती नाकारत मंत्रिपदाचीच मागणी कायम ठेवली आहे. या घडामोडींवर शिवकुमार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी, ‘मंत्रिपदाची मागणी करण्यात काहीच गैर नाही,’ असे म्हटले आहे.

Cabinet Expansion
Cabinet expansion : फेरमतमोजणीत आमदारकी मिळालेल्या महिला नेत्याला मंत्रि‍पदाची हुलकावणी; अखेरच्या क्षणी मंत्रिमंडळ विस्तारातून वगळलं नाव

दरम्यान, कृष्णाप्पा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी एखाद्या विद्यमान मंत्र्याला पदाचा त्याग करावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मंत्री एच. सी. बालकृष्ण यांनी पक्षाच्या निर्णयासाठी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागडी मतदारसंघाचे आमदार बालकृष्ण यांना यंदाच प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तरीही पक्षाच्या हितासाठी त्याग करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पक्षाने सांगितले तर मी राजीनामा देईन. माझे मंत्रिपद कृष्णाप्पा यांना देण्याचा निर्णय झाला, तरी आपल्याला कोणतीही हरकत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com