Congress Politics : काँग्रेसमध्ये नव्या संघर्षाची ठिणगी? प्रदेशाध्यक्षपदासाठी तीव्र राजकीय हालचाली; बड्या नेत्याचे नाव आघाडीवर

satish jarkiholi responds to karnataka congress president post : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलानंतर आता डी. के. पर्व सुरू होणार आहे. शिवकुमार यांचा शपथविधी ३ जूनला होणार असून त्याआधीच काँग्रेसमध्ये नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे.
Karnataka Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar
Karnataka Congress leaders Siddaramaiah and DK ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

karnataka congress president post speculation news : कर्नाटकात काँग्रेसमधील अंतर्गत बंडानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पाय उतार व्हावं लागलं असून आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणार आहेत. त्यांचा शपथ विधी ३ जूनला होणार असून याची जय्यत तयारी केली जात आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये नव्या वादळाची चाहूल लागली असून केपीसीसीच्या नव्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्षावरून राजकीय रण तापताना दिसत आहे. नव्या प्रदेशाध्यक्षावरून येथे स्पर्धा तीव्र झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

तर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र जारकीहोळी यांनी पुढील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करून दिल्लीहून परतल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

मागील विधानसभा निवडणूक काँग्रेसने डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्यानंतर राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आले आणि डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. तरीही लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडेच केपीसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीनंतर केपीसीसी अध्यक्ष बदलाबाबत चर्चा रंगली होती.

Karnataka Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar
Congress Politics: राहुल गांधींचा 'मास्टर प्लॅन' ठरला; काँग्रेसमध्ये लवकरच उलथापालथ; महाराष्ट्रासह सात राज्यांचे 'कारभारी' बदलणार?

मात्र, उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी डी. के. शिवकुमार यांनी सांभाळली. दरम्यान, सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा देऊन केपीसीसी अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यावेळी हायकमांडने नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला नव्हता. पण आता डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना केपीसीसी अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षपदासाठी सतीश जारकीहोळी यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात.

‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणामुळे नाराजी, नवी सत्तास्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. अशातच जारकीहोळी यांनी पुढील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत आपण पुढील केपीसीसी अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत जारकीहोळी आघडीवर असले तरी हायकमांडच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणामुळे त्यांच्यासह पदासाठीच्या इच्छुकांमध्ये नाराजी असल्याचे मानले जोते.

यावेळी जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतरच पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील. ‘सिद्धरामय्या आणि शिवकुमार दिल्लीला गेले आहेत. ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. त्यांनी जो निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य असेल. तसेच मंत्रिपदाबाबत आपण इच्छुक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत अद्याप चर्चा सुरू झालेली नाही. उपमुख्यमंत्र्यांची संख्या किती असेल, याबाबतही अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी संध्याकाळपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान आता पक्षांतर्गत नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली असून कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या (केपीसीसी) अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार, यावरून पक्षात तीव्र राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक वरिष्ठ नेत्यांनी पडद्यामागे लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. शिवकुमार हे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख शक्तिकेंद्र मानले जातात. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत पक्षात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Karnataka Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar
Congress Politics : काँग्रेसचा मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत! राहुल गांधींनी बैठक घेतली अन्...

सध्या केपीसीसी अध्यक्षपदासाठी गृहमंत्री जी. परमेश्वर, वनमंत्री ईश्वर खांड्रे आणि वरिष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांची नावे चर्चेत असली तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. जारकीहोळी यांना ‘अहिंद’ तसेच मागासवर्गीय समाजात चांगला पाठिंबा असल्याचे मानले जाते. सिध्दरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जारकीहोळी यांनाही शिवकुमार यांच्याप्रमाणेच दिलेली सवलत नाकारल्यास समानतेचा प्रश्न निर्माण होईल, अशीही चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com