Karnataka Election : भाजपने तिकीट नाकारल्याने केएस ईश्वरप्पा नाराज?; थेट पंतप्रधान मोदींचा फोन अन्...

Karnataka Politics : कर्नाटक निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएसची प्रतिष्ठा पणाला लागली
Karnataka Election
Karnataka ElectionSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकीतील उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार राजकीय पक्ष जोरदार करत आहेत. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून राज्यातील सत्ताधारी भाजपने सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

Karnataka Election
Sharad Pawar News : पुलवामाबाबत अनेक गोष्टी उघड, पण तपास का नाही? पवारांचा केंद्र सरकारला सवाल!

या पार्श्वभूमीवरच शिवमोगा विधानसभा जागेबाबत राजकीय वातावरण तापलं आहे. या जागेवर भाजपने माजी मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांच्या मुलाला तिकीट नाकारलं आहे. तर त्याच्या मुलाऐवजी दुसरा उमेदवार रिंगणात उभा केला आहे.

त्यामुळे के.एस.ईश्वरप्पा यांनी नाराजी व्यक्ती केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र, त्यानंतर नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:पुढाकार घेत शुक्रवारी के.एस.ईश्वरप्पा यांना फोन करून त्यांची समजूत घातली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Karnataka Election
Ajit Pawar Interview : नरेंद्र मोदीनंतर कोण? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के.एस.ईश्वरप्पा यांच्याशी फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर के.एस.ईश्वरप्पा यांनी पंतप्रधानांना भाजपच्या विजयासाठी एकत्र काम करू असं आश्वासन दिलं. त्याबरोबरच फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असंही ईश्वरप्पा यावेळी म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, याच मुद्यांवरून काँग्रेसने ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, या व्यक्तीवर ४० टक्के दलाली मागितल्याचा आरोप आहे. तसेच ईश्वरप्पांचे अभिनंदन हे भ्रष्टाचाराचे समर्थनच आहे, अशी टीका यावेळी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकारण तापलं आहे.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com