NDA victory : मतपत्रिकांवर निवडणूक, 'NDA'च्या लाटेत काँग्रेससह विरोधक भूईसपाट; भाजपला 'अच्छे दिन'

Andhra Pradesh election results, Chandrababu Naidu, Pawan Kalyan, BJP Andhra Pradesh : एनडीएतील दुसरा पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जन सेवा पार्टीने अनुक्रमे ७३ आणि ९३८ जागा मिळविल्या आहेत. हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
NDA election victory
NDA election victorySarkarnama
Published on: 
Updated on: 

Ballot paper elections results : देशात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या २८ जागांच्या निवडणुकीत एनडीएने बाजी मारली होती. ही निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडविली होती. आता आंध्र प्रदेशातही मतपत्रिकांवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेससह विरोधकांची वाताहात झाली आहे.

तेलुगु देसम पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने जिल्हा परिषदेच्या ५८२ वॉर्डांपैकी ४९९ आणि नगर परिषदेच्या ७ हजार ७६८ जागांपैकी ५ हजार ८६१ जागांवर विजय मिळविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसला अनुक्रमे ७६ आणि १ हजार ७११ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

निवडणुकीत काँग्रेसला अनेक जिल्हा परिषदा व नगर परिषदांमध्ये भोपळाही फोडता न आल्याचे वृत्त आहे. राज्यात ५ नोव्हेंबरला २८ जिल्ह्यांत ही निवडणूक झाली होती. त्याआधी जिल्हा परिषदेचे ७७ वॉर्ड आणि नगर परिषदेचे २ हजार ५१ वॉर्डमध्ये बिनविरोधत निवडणूक झाली होती. राज्यातील या निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने अनुक्रमे ४०६ आणि ४ हजार ८०६ जागा मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे.

NDA election victory
BJP MLA Cousin Death : दिवाळीतच भाजपच्या महिला आमदाराच्या भावाची हत्या; काँग्रेस नेते अमोल दीक्षित यांच्यावर संशयाची सूई...

एनडीएतील दुसरा पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जन सेवा पार्टीने अनुक्रमे ७३ आणि ९३८ जागा मिळविल्या आहेत. हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर भाजपनेही या निवडणुकीत पहिल्यांदाच चांगली कामगिरी केली आहे. भाजपला अनुक्रमे २० आणि ११७ जागांवर विजय मिळाला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि एनडीएच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते.

NDA election victory
PM Modi news : मुख्यमंत्री फडणवीस यांची 'ही' कृती मनाला स्पर्श करणारी! PM मोदींना दिवाळीत कोणती गोष्ट भावली?

दरम्यान, निवडणुकीच्या निकालावर वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक निकालामध्ये गडबड करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू निवडणूक जिंकले असले तरी त्यांचा नैतिक पराभव झाला आहे. आम्ही निवडणूक हरलो असलो तरी लोकांची मने जिंकली आहेत, असे रेड्डी म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.