New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने गुरुवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नऊ उमेदवारांचा समावेश असून, सर्वजण तामिळनाडूतील आहेत. राज्यपालपदाचा नुकताच राजीनामा दिलेल्या तमिलसाई संदुरराजन यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
भाजपने (BJP) तामिळनाडूतील 39 जागांपैकी 20 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्यांनी मित्रपक्षांना उर्वरित जागा सोडल्या आहेत. मागील वर्षी अण्णाद्रमुकने भाजपची साथ सोडल्याने पक्षाला राज्यातील स्थानिक छोट्या पक्षांशी युती करावी लागली आहे. त्यामुळे भाजपलाच पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे.
तमिलीसाई सुंदरराजन यांनी नुकताच तेंलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट मिळू शकते, अशी चर्चा होती. त्यानुसार आज भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये त्यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांनी चेन्नई दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचेही नाव असून, ते निलगिरी मतदारसंघातून लढतील. भाजपचे तामिळनाडूचे (Tamil Nadu) प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना कोईम्बतूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, भाजपने पहिल्या उमेदवारी यादीत 195 जणांची, तर दुसऱ्या यादीत 72 जणांचा समावेश केला होता. आता आणखी नऊ जणांची नावे जाहीर करत भाजपने इतर पक्षांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन याद्यांमध्ये महाराष्ट्रासह (Maharashtra) उत्तरेकडील राज्यांतील उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे.
तामिळनाडूतील नऊ उमेदवारांची नावे -
1. चेन्नई साउथ- तमिलीसाई सुंदरराजन
2. चेन्नई सेंट्रल- विनोज पी. सेल्वम
3. वेल्लोर- ए. सी शन्मुगन
4. कृष्णागिरी- सी नरसिम्हन
5. नीलगिरी- एल मुरुगन
6. कोईम्बतूर- के. अण्णामलाई
7. पेरमबलुर- टी. आर. पारिवेनधर
8. थोथुक्कुड़ी- नैनर नागेंद्रन
9. कन्याकुमारी- राधाकृष्णन
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.