Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींना भेटणार; नेमकं काय आहे कारण...

Mamta Banerji तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
India aghadi
India aghadi sarkarnama

News Delhi News : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप करत मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरुन विरोधकांचे शिष्टमंडळ उद्या (गुरुवारी) राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय आहे.

इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजांवर संशय आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ थेट आता राष्ट्रपतींशी या विषयावर चर्चा करणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झालं आहे. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. टक्केवारीत तफावत कशी, यावरुन निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा हा 19 एप्रिलला झाला. या दिवशी देशात संध्याकाळपर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झालं. यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान झाल. या दिवशी सरासरी 61 टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली.

राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट॒ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनल फॅलो करा!

India aghadi
Maratha Reservation All Party Meeting : जरांगेंनी सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवावा; एकनाथ शिंदेंचे आवाहन

दोन्ही टप्पे मिळून 60 टक्के सरासरी मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने कळवलं. मात्र 11 दिवसांनी म्हणजेच 30 एप्रिलला 66 टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली. याचाच अर्थ आधी आणि नंतर दिलेल्या आकडेवारीत 6 टक्क्यांचा फरक आहे. 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे हा विलंब का लागला? याचं उत्तर विरोधक निवडणूक आयोगाकडे मागत आहेत.

याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले की, पहिल्या टप्प्यातील मतदानाचे आकडे 11 दिवसांनंतर का आले? दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे आकडे 4 दिवसानंतर येण्याचा अर्थ काय, मतदानाच्या 24 तासांच्या आत आकडेवारी का आली नाही. अंदाजित आणि अंतिम आकडेवारीत इतका फरक कसा झाला, असे ही त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

India aghadi
Congress News : विदर्भातील 10 आमदार पुण्यात तळ ठोकून, रवींद्र धंगेकरांसाठी विशेष रणनीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com