Amita Singh Tomar: अमिताभ बच्चन यांच्या समोर व्हॉटसीटवर बसलेल्या महिला तहसिलदाराला अटक; नक्की काय घडलं?

KBC Winner Amita Singh Tomar Arrested: केबीसी विजेत्या तहसीलदारअमृता सिंह तोमर यांना मध्य प्रदेशातील पूर मदत घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
KBC Winner Amita Singh Tomar Arrested
KBC Winner Amita Singh Tomar ArrestedSarkarnama
Published on
Updated on

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती तील सहभागी झालेल्या महिला तहसीलदार अडचणीत सापडल्या आहेत. अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात त्यांना मध्य प्रदेशातील ग्वालियरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे मध्य प्रदेशातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमृता सिंह तोमर यांना 2021 मध्ये बडोदा तहसील विभागात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आहे.

उलट-सुलट प्रतिक्रिया

अमृता सिंह तोमर या ‘कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्याठिकाणी स्पर्धेक म्हणून 50 लाख रुपये जिंकले आहेत. आता त्यांना अटक झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तोमर यांना शिवपुरी येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.

KBC Winner Amita Singh Tomar Arrested
Ashok Kharat Case: सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील खरातच्या जाळ्यात; 10 तास चौकशी, म्हणाला, '...केलेली कृती हा विधीचाच एक भाग'

तत्कालीन तहसीलदार

सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. मध्यप्रदेशमधील श्योपुर जिल्ह्यातील पुरग्रस्त व्यक्तींना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप तोमर यांच्यावर आहे. तेव्हा त्या तत्कालीन तहसीलदार होत्या.

KBC Winner Amita Singh Tomar Arrested
Pune News: महसूल अधिकारांचा गैरवापर भोवला! सरकारचा 46 अधिकाऱ्यांना दणका; पदोन्नती थांबणार

गुन्हा दाखल

कंत्राटदारांना हाताशी धरुन तोमर यांनी 127 बनावट बँक खाते उघडून पुरग्रस्तांना मिळालेली रक्कम सुमारे अडीच कोटी रुपये या खात्यात वळवली. हा प्रकार उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाली. त्यानंतर बडोदा पोलिस ठाण्यात तोमर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

KBC Winner Amita Singh Tomar Arrested
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी प्रशासकीय कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका; अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

पदावरुन हटविण्यात आले

अटक करण्यात आल्यानंतर तोमर यांनी पहिल्यांदा ग्वालियर खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर तोमर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानेपण त्यांची याचिका रद्द केली आहे. यानंतर त्यांना विजयपुर तहसीलदार पदावरुन हटविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com