Pune’s Haveli land measurement scam: जमिनी मोजणीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेल्या नंतर राज्य सरकारने संबधीतांवर कडक कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील 46 अधिकारी दोषी आढळले आहेत.
या खटल्यांचा वाढता आलेख पाहता या चौकशीला किमान ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत या कर्मचाऱ्यांची होणारी पदोन्नती थांबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महसूल संहिता अधिनियमातील कलम १५५ च्या अधिकारांचा गैरवापर हे प्रकरण समोर आल्यानंतर आता जमीन मोजणीतील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामध्ये हवेलीचे तत्कालीन उप अधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासह तब्बल ४६ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारला केली आहे.
परवानगी मिळाल्यानंतर या सर्वांची चौकशी राज्य सरकारकडून सुरू होणार आहे. या चौकशीमुळे या सर्वांना या काळात पदोन्नतीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या ४६ जणांपैकी काही जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर हवेली कार्यालयात सध्या ३९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील २८ जणांची चौकशी होणार आहे.
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूमापक किरण येटोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोघांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर पाटील आणि येटोळे यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पाटील यांच्या सुमारे चार वर्षांच्या काळातील कामकाजाची सर्व प्रकरणे तपासण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रकरणात कुणाचा सहभाग आहे, याचीही खातरजमा करण्यात आली. त्यानुसार ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.
त्यात पाटील आणि येटोळे यांच्यासह अन्य ४४ जणांचा समावेश असल्याचे त्यात तपासात आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस राज्य सरकाला करण्यात आली असल्याचे भूमी अभिलेख विभागातील सुत्रांनी सांगितले.
मुख्यालय सहाय्यक, प्रमुख भूमापक, भूमापक, प्रमुख लिपीक, छाननी लिपीक, अभिलेखापाल, प्रतिलिपी लिपीक, दुरुस्ती लिपीक, नगर भूमापन लिपीक, लिपिक या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
१३ जणांची खंडाळा, कोरेगाव, फलटण, वाई, सातारा व इचलकरंजी या ठिकाणी बदली झाली आहे. एक निवृत्त झाले आहे.
५ जणांची जिल्ह्यातील अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. हवेली उपअधीक्षक कार्यालयात एकूण ३९ कर्मचारी कार्यरत आहेत.
राज्य शासनाने त्यास मान्यता दिल्यानंतर ३९ पैकी २९ कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी सुरू करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांची होणारी पदोन्नती थांबविण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास वेगळी कारवाई होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.