

Mumbai News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेच्या खासदार फुटीसंदर्भात बोलताना खळबळजनक दावा केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी(ता.16)रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये "अपना सपना मनी..मनी! म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद असल्याचा आरोप केला होता. याचवरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं ते गंभीर विधान चर्चेत आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वादावर टिप्पणी केली.त्यांनी प्रत्येक खासदाराची किंमत 50 कोटी रुपये आहे आणि 15 कोटी रुपये हा केवळ ॲडव्हान्स असल्याचा दावा केला होता.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांनी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी खासदार संजय राऊतांच्या 15 कोटींचा अॅडव्हान्सच्या पोस्टचा संदर्भ देत मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या, फक्त 15 कोटी...एवढे स्वस्तात हे खासदार कसे जात आहेत.
तृणमूल काँग्रेस खासदार फोडण्यासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांचा संदर्भ दिला आहे. त्यांनी 'हनी प्लस मनी' असा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे. त्या म्हणाल्या, आमच्या टीएमसीच्या फोडण्यात आलेल्या प्रत्येक खासदाराला 4 कोटी रुपये ॲडव्हान्स मिळाले असून, 36 महिन्यांच्या उर्वरित कार्यकाळात दरमहा 1 कोटी रुपये दिले जाणार असल्याचा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर रविवारी (ता.14 जून) त्यांच्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला काही खासदार प्रत्यक्षरित्या उपस्थित न राहता, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती तर काही गैरहजर राहिले होते. तेव्हापासूनच 'खासदार फुटी'च्या चर्चांना वेग आला होता.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मातोश्रीवरील बैठकीला यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे बैठकीसाठी मातोश्रीवर हजर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.