

अमेरिकेत ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाले आहे.
इराणविरोधातील युद्ध आणि वाढती महागाई यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
अमेरिकेसह तेल अवीवमध्येही युद्धविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
Iran Israel War Update : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध मागील एक महिन्यापासून सुरू असून ते अद्याप थांबलेले नाही. दरम्यान या युद्धाची झळ अख्या जगाला बसत असून हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतासह जगातील अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले असून हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी अमेरिकेवर दबाव टाकण्यात येत आहे.
दरम्यान अमेरिकेत लाखो लोक ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले असून No Kings आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर इस्त्रायलमध्येही युद्धखोरीला विरोध सुरू झाला असून तेल अवीवमध्येही लोक लोक युद्ध थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या विरोधामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपल्याच देशात पडले एकटे पडल्याचे दिसत आहे.
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध भडकत चालले असून ट्रम्प आणि नेतन्याहू इराणला इशाऱ्यावर इशारे देताना दिसत आहेत. पण इराणकाही मागे हटण्यास तयार नाही. काहीच दिवसात हे युद्ध थांबेल अशी शक्यता ट्रम्प आणि नेतन्याहू यांना होती. मात्र काटक इराणच्या निकराच्या लढ्यामुळे गेल्या २८ दिवसांपासून हे युद्ध धगधगत आहे.
आता हे युद्ध न थांबल्यास इंधन टंचाईचा भडगा जगभरात भडकण्याची चिंता आहे. यावरून आता जगभर हे युद्ध थांबावे अशी मागणी होत असतानाच अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धखोरी विरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात तब्बल ९० लाख लोक रस्त्यावर उतरून आपला विरोध दाखवत आहेत.
ट्रम्प यांना तानाशाही, हुकूमशाही आणि युद्धखोर असे सुनावत जवळपास 90 लाख लोकांनी इराणविरोधातील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या लोकांनी ट्रम्प यांना हाकलण्याचा निर्धार देखील करत शनिवारी तीव्र निदर्शने केलीत. ट्रम्प यांची धोरणं, वाढती महागाई तसेच इराणसोबतचे युद्ध या मुद्दावरून नागरीक संतप्त झाले असून अमेरिकेतील जवळपास प्रत्येक शहरात No Kings आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
एकीकडे जवळपास प्रत्येक शहरासह अगदी छोट्या गावातही ट्रम्प यांच्याविरोधातील असंतोष उफाळून आला असून ट्रम्प यांच्याविरोधात नारेबाजी केली जातेय. न्यूयॉर्क सिटी, मिडटाऊन मॅनहडनमध्ये मोठे आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला आहे. तर सॅन फ्रान्सिस्कोसह अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यातून ट्रम्प यांना हाकलण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच युक्रेन युद्ध आणि ट्रान्सजेंडर धोरणावरूनही ट्रम्प यांना विरोध केला जात आहे.
तर दुसरीकडे इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये सुद्धा लाखो लोक इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धावरून रस्त्यावर उतरली आहेत. येथेही लोक No War चे नारे लगावत असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरली आहेत. येथे लाखो लोकांनी सरकारविरोधात नारेबाजी करताना दिसत असून नेतन्याहू यांनी युद्ध थांबवावे अशी मागणी करत आहेत.
नेतन्याहू यांच्या धोरणामुळे आणि ततच्या युद्धामुळे इस्त्रायलची जनताही विटली आहे. युद्धामुळे महागाई भडकल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तर आता अमेरिकेसह इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे येथील जनता या युद्धामुळे नाराज असल्याचे दिसत आहे. तर ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी हे युद्ध जगावर लादल्याचे बोलले जात असून तसे राजकीय विश्लेषकांचेही म्हणणे आहे.
1. अमेरिकेत आंदोलन का सुरू झाले आहे?
ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात आणि इराण युद्धाच्या विरोधात आंदोलन होत आहे.
2. आंदोलनात किती लोक सहभागी झाले आहेत?
जवळपास 90 लाख लोक सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.
3. आंदोलनाचे मुख्य मुद्दे काय आहेत?
इराण युद्ध, महागाई आणि ट्रम्प यांची धोरणे हे मुख्य मुद्दे आहेत.
4. हे आंदोलन फक्त अमेरिकेतच आहे का?
नाही, इस्त्रायलमधील तेल अवीवमध्येही युद्धविरोधात आंदोलन झाले आहे.
5. या आंदोलनाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय दबाव वाढू शकतो आणि धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.