

Delhi : मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्यातला संघर्ष लपून राहिलेला नाही. केजरीवाल हे सातत्यानं मोदी सरकारवर बेरोजगारी, महागाई, शिक्षण, भ्रष्टाचार यांसह विविध मुद्द्यांवरुन सातत्यानं मोदी, शाह यांच्यावर टीकेची तोफ डागत असतात. विरोधी पक्षातील एक महत्वाचे नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
याचदरम्यान, एका कार्यक्रमात केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच कार्यक्रमाला उपस्थित काही कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या. त्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घोषणा देणाऱ्यांची खडेबोल सुनावले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal ) यांच्या हस्ते गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या (IP यूनिव्हर्सिटी) पूर्व दिल्लीतील कॅम्पसच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रकार घडला. केजरीवाल यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी 'मोदी...मोदी' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर केजरीवाल यांनी संबंधित कार्यकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
केजरीवाल नेमकं काय म्हणाले?
'आम आदमी पक्षा'(AAP)ने त्यांच्या ट्विटर हँडलवरून संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असा आरोप 'आप'नं ट्विटद्वारे केला आहे. जर अशा घोषणांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होऊ शकली असती तर, ७० वर्षांत ती झाली असती असं उत्तर अरविंद केजरीवाल यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं.
केजरीवाल म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. मी काही कोणाला शिव्या देत नाही. जे बोलतोय ते आक्षेपार्ह नसेल. तुम्हाला आवडलं तर ठीक, नाही आवडलं तरी काही हरकत नाही असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.