Donald Trump tension : जगाला मोठा हादरा बसणार? विकेंडची सु्ट्टी रद्द करत ट्रम्प तातडीने व्हाईट हाऊसमध्ये, उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र

North Korea Missile launch, Japan EEZ missile, Iran US conflict, : उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांनी पूर्व आशियात तणाव वाढला; पश्चिम आशियातील संघर्ष, इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची तातडीने गाठले व्हाईट हाऊस.
North Korea Missile launch
North Korea Missile launchSarkarnama
Published on
Updated on

North Korea Missile launch news : मागील काही महिने पश्चिम आशियातील देशांमध्ये तीव्र संघर्ष सुरू असतानाच आता पूर्व आशियामध्येही ठिणगी पडली आहे. काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने दोन क्षेपणास्त्र डागल्याचे समोर आले आहे. ही क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेरील समुद्रात पडली. काही दिवसांपूर्वीही उत्तर कोरियाने अशीच कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र डागली होती.

पश्चिम आशियामध्येही पुन्हा संघर्ष पेटला आहे. इराणचा पाठिंबा हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियासह अन्य देशांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या देशांमध्ये युध्दाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घडामोडी घडत असतानाच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपली विकेडची सुटी रद्द करून एक दिवस आधीच व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत.

ट्रम्प यांची सुटी रद्द करण्यामागेच अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पश्चिम आशियातील संघर्ष, उत्तर कोरियाची आक्रमक भूमिका ही कारणे सांगितली जात आहेत. इराण आणि अमेरिकेमध्ये अद्यापही शांतता करार झालेला नाही. इराणकडून काही अटींवर माघार घेतली जात नसल्याने ट्रम्पही आक्रमक आहेत. ते सातत्याने इराणला गर्भित इशारा देत आहेत.

North Korea Missile launch
काँग्रेसने तिकीट नाकारले, पठ्ठ्याने अपक्ष लढत जिंकली निवडणूक; 14 दिवस अनवाणी प्रचार

दुसरीकडे उत्तर कोरियाकडून मागील काही दिवसांत पूर्व किनाऱ्यावर कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र डागली जात आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, रविवारी सायंकाळी काही तासांच्या अंतरात दोन क्षेपणास्त्र जपानच्या दिशेने डागण्यात आली. दुसरे क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) बाहेरील समुद्रात पडल्याचे माहिती समोर आली आहे. पहिल्या षेपणास्त्राने सुमारे 440 किलोमीटर ईशान्य दिशेने प्रवास केला आणि त्यानंतर जपानच्या EEZच्या बाहेरील समुद्रात कोसळल्याची माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

North Korea Missile launch
BJP MP case : लोकसभेत काँग्रेसच्या ज्या नेत्याने केला पराभव, भाजप उमेदवाराचे त्यांच्याच लेकीशी लग्न; आता पत्नी खासदार, पण झाला घटस्फोट

उत्तर कोरियाने यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. विशेष म्हणजे एक दिवस आधी जपानने अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबत त्रिपक्षीय लष्करी सराव पूर्ण केला होता. ट्रम्प या वर्षाच्या अखेरीस उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्याच्या घडामोडींना महत्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com