NEET Paper Leak: NTAनं पुन्हा जबाबदारी झटकली! संसदीय समितीला सांगितलं आमच्या सिस्टिमची चूक नव्हतीच; व्हायरल झालेला पेपर...

NEET Paper Leak: या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु झाली असून राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका संसदीय समितीमार्फत याची चौकशी केली जात आहे.
National Testing Agency
National Testing AgencySarkarnama
Published on
Updated on

NEET Paper Leak: वैद्यकीय शिक्षणासाठीच्या पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा (NEET) पेपर फुटीप्रकरणी सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु झाली असून राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका संसदीय समितीमार्फत याची चौकशी केली जात आहे. या समितीच्या समोर आज एनटीएकडून पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार घडला आहे.

National Testing Agency
Mamata Banerjee: दिल्लीत मोठ्या घडामोडी! ममतांची 'इंडिया'च्या बैठकीला उपस्थिती अन् तृणमूलचे २० खासदार नॉटरिचेबल; सुवेंदू अधिकारीही पोहोचले

पीटीआयच्या वृत्तानुसार, एनटीएनं समितीसमोर सांगितलं की, ०३ मे रोजी आयोजित नीट परीक्षेचा पेपर लीक झालाच नव्हता. तर सोशल मीडियातून आणि विद्यार्थ्यांकडे फिरत असलेला पेपर हा गेस पेपर होता. त्यामुळं आमच्या सिस्टिमकडून कुठलाही पेपर लीक झालेला नाही. त्यावर संसदीय समितीनं एनटीएला विनंती केली की, पेपर लीकची योग्य व्याख्या समजून घ्यावी आणि त्यानंतर २०१८ नंतर पेपर लीक झाला की नाही हे सांगावं.

National Testing Agency
Rajendra Jain: भुजबळांना ओव्हरटेक करुन राज्यसभेचा अर्ज भरणाऱ्या राजेंद्र जैन यांनी स्पष्ट केली भूमिका; राष्ट्रवादीतल्या सुप्त संघर्षावरही केलं भाष्य

दिग्वीजय सिंह यांच्या नेतृत्वाखाल शिक्षण, महिला, मुलं, तरुण आणि खेळांच्या प्रकरणातील संसदीय समितीनं नीट पेपर लीक आणि सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टिम (OSM) शी संबंधीत वादांची चौकशी करत आहे. या समितीनं या चौकशीसाठी NTA आणि सीबीएसई दोन्हींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या समितीनं OSM सिस्टिम संदर्भात सीबीएसई आणि नीटच्या पेपर लीक प्रकरणी एनटीएकडून लिखित उत्तर मागितलं आहे.

National Testing Agency
Sharad Pawar on Bhujbal: छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी डावललं! शरद पवारांनी केलं भाष्य; नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, त्यांनी राधाकृष्णन समितीच्या १०१ शिफारशींपैकी प्रत्येक शिफारशींवर एक सविस्तर अहवाल आणि प्रत्येक शिफारशीच्या उत्तरादाखल एनटीएनं काय कारवाई केली याची माहिती मागितली. तसंच सीबीएसईच्या पॅनलला विचारलेल्या प्रश्नांना ८ जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर NTA ला १० जूनपर्यंत लिखित उत्तर द्यावं लागणार आहे. पण या दोन्ही एजन्सीजनं अद्यापर्यंत उत्तर दिलेलं नाही, अशी माहितीही सुत्रांकडून कळते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com