

Operation Sindoor Martyred : 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शहीद झालेल्या सहा भारतीय जवानांची नावे पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली आहेत. शहीद झालेल्या या जवानांची नावे 'नॅशनल वॉर मेमोरियल'च्या संकेतस्थळावरील 'रोल ऑफ ऑनर' विभागात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
तर, शहीद झालेल्या जवानांची नावे दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरियल'वर कोरली जाणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जण ठार झाले होते. या दहशतवादी हल्ल्यावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले होते. याबाबतची माहिती आता सरकारने सार्वजनिक केली आहे. सरकारने शदीद झालेल्या सहा जवानांची नावे भारताने पहिल्यांदाच जाहीर केली आहेत. या सहा जवानांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा समावेश आहे.
देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या सहा सैनिकांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. शहीद झालेल्यांमध्ये, सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मूड मुरली नायक, हवालदार सुनील कुमार सिंग, सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
तर रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आला आहे. तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 च्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. ज्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले होते. याच कारवाई दरम्यान भारताचे जवान देखील शहीद झाल्याची माहिती आता सरकारने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.