Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव? विरोधक मोठं पाऊल उचलणार...

Rajya Sabha Session Impeachment Motion : राज्यसभेत शुक्रवारी जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यासह इतर काही सदस्यांमध्ये चांगली खडाजंगी झाली.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेत शुक्रवारी सभापती जगदीप धनखड आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चमकम उडाली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर विरोधी बाकावरील एकही खासदार सभागृहात उपस्थित राहिला नाही. विरोधकांकडून धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी जगदीप धनखड यांच्या बोलण्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून धनखड चांगलेच भडकले आणि त्यांना मर्यादेत राहून वागण्याचा सल्ला दिला. इथेच वादाची ठिणगी पडली आणि विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कामकाजावर बहिष्कार टाकला.

Jagdeep Dhankhar
Video Rajya Sabha Session : जया बच्चन यांच्यावर धनखड संतापले; म्हणाले, तुम्ही असाल सेलिब्रिटी पण..!  विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

विरोधक यावरून आक्रमक झाले असून संविधानातील अनुच्छेद 67 नुसार धनखड यांच्याविरोधत महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याचे समजते. अनुच्छेद 67 नुसार उपराष्ट्रपतींना राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने पारित आणि लोकसभेद्वारे सहमत एक प्रस्तावाद्वारे त्यांना हटवले जाऊ शकते. त्यासाठी चौदा दिवसांची नोटीस द्यावी लागले.

काय घडलं सभागृहात?

खासदार घनश्याम तिवारी यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे तिवारी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर बोलण्यासाठी धनखड यांनी जया अभिताभ बच्चन असे नाव उच्चारले. त्यावर जया बच्चन भडकल्या.

Jagdeep Dhankhar
Video Delhi Minister Atishi : विद्यार्थी, पालकांसमोर दिल्लीच्या मंत्री अतिशी स्टेजवरच ढसाढसा रडल्या; नेमकं काय घडलं?

‘मी एक अभिनेत्री आहे. बॉडी लँग्युएज, एक्सप्रेशन समजू शकते. सर, मला माफ करा, तुमचा जो टोन आहे, तो मला आवडला नाही. तुमचा टोन अस्वीकार्य आहे,’ असे जया बच्चन यांनी म्हणताच धनखड भडकले. ते म्हणाले, जयाजी, तुम्ही खूप काही कमावले आहे. मी दररोज पुनर्रूचार करू इच्छित नाही. दररोज तुमची शाळा घेऊ इच्छित नाही. तुम्ही माझ्या टोनवरून बोलत आहात? मी हे सहन करणार नाही. तुम्ही सेलिब्रिटी असाल, पण तुम्ही डेकोरम मानवाच लागेल, असे शब्दांत धनखड यांनी जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिले.

जया बच्चन आणि धनखड यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दादागिरी नहीं चलेगी, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट केले. त्याचा सत्ताधारी खासदारांनी निषेध करत निषेध प्रस्ताव सभागृहात मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com