Panneerselvam Joins DMK : विधानसभा निवडणुकीच्याआधी मोठा ट्विस्ट, माजी मुख्यमंत्र्याने पक्षच बदलला! डीएमकेची ताकद वाढली

DMK Tamil Nadu Politics : तामिळनाडून विधानसभेची निवडणूक मे महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षात असलेल्या एडीएमके पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातून निलंबीत माजी मुख्यमंत्र्याने सत्ताधारी डीएमकेमध्ये प्रवेश केला आहे.
Panneerselvam Joins DMK
Panneerselvam Joins DMK sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu News : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. एडीएमके पक्षाकडून तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले नेते पन्नीरसेल्वम यांनी डीएमके प्रमुख, मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांच्या उपस्थितीत डीएमके पक्षात प्रवेश केला.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर एडीएमकेमध्ये पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्यात पक्षनेतृत्व करण्यावरून संघर्ष सुरू होता. पन्नीरसेल्वम यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले होते. अखेर त्यांनी डीएमकेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

पन्नीरसेल्वम यांच्या डीएमकेमधील पक्ष प्रवेशाने तामिळनाडूच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार असून डीएमके आणखी मजबूत होणार आहे. पन्नीरसेल्वेम हे थेवर समाजातून येतात. त्या समाजातून त्यांना मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हा समुदाय डीएमकेसोबत जाण्याची शक्यता आहे.

Panneerselvam Joins DMK
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; मद्य धोरण घोटाळ्याचा निकाल लागला, केजरीवाल ढसाढसा रडले...

तीन वेळा मुख्यमंत्री

पन्नीरसेल्वम हे 2001 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवले. त्यानंतर त्यांनी सहा महिन्यांनी राजीनामा दिला. 2014 मध्ये त्यांनी दुसऱ्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, यावेळी त्यांचे मुख्यमंत्री पद अवघा एक महिना टिकले. तिसऱ्यांदा ते 2016 मध्ये मुख्यमंत्री झाले मात्र 2017 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Panneerselvam Joins DMK
Ajit Nawale Kisan Sabha Long March : ‘शेतकरी संप’ विसरू नका! आता कष्टकरी रस्त्यावर; विखेंच्या लोणीतून उठणार बंड, अजित नवलेंचा थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com