Supreme Court : सुप्रीम कोर्टाकडून मायावतींना वाढदिवसाचं मोठं गिफ्ट; तब्बल 15 वर्षांनंतर आला तो दिवस...

Mayawati Uttar Pradesh Ex CM Bahujan samaj Party : मायावती उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री असताना अनेक गंभीर आरोप झाले होते.
Mayawati
Mayawatisarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो व उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना सुप्रीम कोर्टाने बुधवारी मोठा दिसाला दिला. मायावती यांचा बुधवारी वाढदिवस असून एकप्रकारे कोर्टाने त्यांना गिफ्ट दिले आहे. तब्बल 15 वर्षांपूर्वीचे मायावती यांच्याविरोधातील एक प्रकरण कोर्टाकडून बंद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री असताना मायावती यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. त्यांनी सरकारी तिजोरीतील पैशांमधून स्वत:चे आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे अनेक पुतळे उभारले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर एका वकिलांनी त्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती.

Mayawati
JP Nadda : नड्डांकडून राहुल गांधींचे आधी कौतुक अन् नंतर टीकेचे बाण; एका विधानाने वादाची ठिणगी

सुप्रीम कोर्टाने बुधवारी या प्रकरणावरील सुनावणी बुधवारी बंद केली. सुमारे 15 वर्षांपूर्वी दाखल ही याचिका खूप जुने प्रकरण असल्याचे सांगत कोर्टाकडून सुनावणी संपवण्यात आली. वकील रविकांत यांनी 2009 मध्ये ही याचिका दाखल केली होती. जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याने बहुजन समाज पक्षाकडून हा पैसा वसूल करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. 

जनतेच्या पैशातील पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे उद्यानांमध्ये उभारणे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पक्षाचे चिन्ह जप्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. मात्र, आता या याचिकेवरील सुनावणी बंद करण्यात आली आहे.

Mayawati
Rahul Gandhi vs RSS : 'दुसऱ्या कोणत्याही देशात अटक झाली असती', राहुल गांधींचा मोहन भागवतांवर हल्लाबोल

दरम्यान, मायावती या 2007 ते 2012 या कालावधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. या काळात त्यांनी लखनऊ आणि नोएडा येथे दोन मोठ्या उद्यानांची निर्मिती केली होती. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बीएसपीचे संस्थापक कांशीराम, पक्षाचे चिन्ह हत्ती आणि स्वत:चे पुतळे उभारले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com