PM Modi News : "...यांनी तर महादेवालाही सोडलं नाही!"; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Chhattisgarh Election PM Modi Target Congress Over Mahadev Betting App Scam : छत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत...
PM Narendra Modi Rally News
PM Narendra Modi Rally NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhattisgarh Election 2023 : पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींची आज छत्तीसगडच्या दुर्गमध्ये जंगी सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हल्लाबोल केला. गरींबामध्ये फूट पाडण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन कारस्थान रचत आहेत आणि जातीयवादाचं विष कालवत आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

PM Narendra Modi Rally News
BJP News : ऐन निवडणुकीच्या प्रचारातच घात झाला,भाजप नेत्याची निर्घृण हत्या; हल्ल्याच्या घटनेने खळबळ

२ हजार कोटींचा मद्य घोटाळा, ५०० कोटींचा सीमेंट घोटाळा, ५ हजार कोटींचा तांदूळ घोटाला, १३०० कोटींचा भूखंड घोटाळा, ७०० कोटींचा DMF घोटाळा. एवढे घोटाळे झाले. छत्तीसगडला लुटण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.

राज्यात भाजपचं सरकार आल्यावर सर्व घोटाळ्यांची कसून आणि सखोल चौकशी केली जाईल. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांची रवानगी तुरुंगात केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. महादेव सट्टेबाजी अॅप घोटाळ्यावरूनही (Mahadev App Scam) पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसने महादेवाचं नावही सोडलं नाही, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भ्रष्टाचार करा आणि खजिना भरा- पीएम मोदी

काँग्रेसने ओबीसी पंतप्रधान आणि संपूर्ण समाजाला काँग्रेसने शिवीगाळ केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. मी अशा शिवीगाळ करणाऱ्यांना घाबरत नाही. गरीबांचं भलं व्हावं, त्यांची जीवनमान उंचावं, हे काँग्रेसला नकोय. काँग्रेसचं प्राधान्य भ्राष्टाचार करणं आणि आपला खजिना भरणं, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

काय आहे महादेव अॅप बेटिंग घोटाळा?

महादेव अॅप बेटिंग घोटाळा हा ५००० कोटींचा आहे. या घोटाळ्याचा ईडीमार्फत तपास करण्यात येत आहे. महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना नियमित पैसे पुरवले जात होते. आणि ही रक्कम ५०८ कोटीपर्यंत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने छत्तीसगडमध्ये कारवाई करत ५.३९ कोटींची रक्कम जप्त केली होती. तसंच १५.५९ कोटी रुपयांची बँक खाती गोठवण्यात आले आहेत. महादेव अॅप घोटाळा हा मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून चालवण्यात येत होता, असं ईडीने म्हटलं आहे.

PM Narendra Modi Rally News
India Alliance : 'इंडिया' आघाडी निष्क्रीय! पवारांनंतर नितीशकुमार स्पष्ट बोलले; खर्गेंचा थेट फोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.