India-Canada Conflict : मोदींचा कॅनडाला आणखी दणका; दूतावासातील ४१ अधिकारी परत बोलावले

India-Canada news update : गेल्या काही दिवसांपासून भारत व कॅनडातील तणाव वाढला आहे.
India-Canada Relation :
India-Canada Relation :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi Political News : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी २१ सप्टेंबर रोजी संसदेत बोलताना भारतावर गंभीर आरोप केले होते. हे सर्व आरोप त्यांनी सार्वजनिकरित्या मागे घेतल्याशिवाय आणि कॅनडातील खलिस्तानच्या दहशतवाद्यांवर कारवाई केल्याशिवाय त्यांच्यासोबत कसलीच चर्चा करणार नाही, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. त्यामुळे कॅनडाला नमती भूमिका घ्यावी लागली.

गेल्या काही दिवसांपासून भारत व कॅनडातील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडातील दूतावासातील ४१ अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले होते. भारत सरकारकडून अशा स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत यापूर्वीचे दिले होते. यापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडाच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यासाठी सांगण्यात आले होते.

India-Canada Relation :
Amol Mitkari Criticised BJP : 'हा' कार्यक्रम म्हणजे भाजपचा प्रचार मेळावा, मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

भारताने कॅनडाविरोधात ही चौथी कारवाई केली आहे. यापूर्वी सुरुवातीला एका गुप्तहेर अधिकाऱ्यांच्या एजन्सीला देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा व्हिसा सेवा बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर कॅनडाच्या नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास बंधने घातली होती. कॅनडाचा दौरा करणाऱ्यांवर केंद्र सरकारकडून प्रतिबंधात्मक आदेश लावण्यात आले होते. त्यामुळे आता सरकारकडून कॅनडाच्या विरोधात हे चौथे पाऊल उचलण्यात आले होते. त्यामुळेच कॅनडाला नमती भूमिका घ्यावी लागते आहे.

भारताने ठणकावल्यानंतर कॅनडानेही त्यांच्या दूतावासातील अधिकारी परत बोलावले होते. भारतात कॅनडाचे ६२ राजनैतिक अधिकारी काम करीत आहेत. त्यापैकी ४१ जणांना परत जाण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. त्यामुळे कॅनडाने या अधिकाऱ्यांना कळवून सिंगापूरला हलविले आहे. त्यांना परत बोलावण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे कॅनडाकडून तातडीने पावले उचलण्यात आली.

Edited By- Anuradha Dhawade

India-Canada Relation :
Nawab Malik Support Ajit Pawar : मोठी बातमी : जामिनावर सुटलेल्या नवाब मलिकांचा अजित पवारांना पाठिंबा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.