TVK News : विजय यांचं सरकार पाडण्यासाठी 'प्रोजेक्ट मेघालय'; TVK च्या आमदारांना 35 कोटींची ऑफर, मुख्य सूत्रधार अटकेत

Tamil Nadu Politics : 'प्रोजेक्ट मेघालय' प्रकरणाचे प्रमुख सुत्रधार म्हणून पुथिया थलैमुरई या स्थानिक चॅनलचे वरिष्ठ पत्रकार विजयन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी विजयन यांची १५ आणि १६ जुलैला चौकशी केली असून त्यांचा मोबाइल जप्त करत तो फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.
Project Meghalaya | TVK MLAs | Tamil Nadu Politics
Project Meghalaya | TVK MLAs | Tamil Nadu PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu government : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचं सरकार पाडण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवल्याचं उघडकीस आलं असून या घटनेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

जोसेफ विजय यांचं सरकार पाडण्यासाठी 'प्रोजेक्ट मेघालय' राबवलं जाणार होतं. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 'प्रोजेक्ट मेघालय'शी प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.

विजय यांचं सरकार पाडण्यासाठी टीव्हीकेच्या आमदारांना प्रत्येकी ३५ कोटींची ऑफर देण्यात आली होती असा गंभीर दावा पोलिसांनी केला आहे. तर या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार म्हणून पुथिया थलैमुरई या स्थानिक चॅनलचे वरिष्ठ पत्रकार विजयन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी विजयन यांची १५ आणि १६ जुलैला चौकशी केली असून त्यांचा मोबाइल जप्त करत तो फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रोजेक्ट मेघालय नेमकं काय आहे?

टीव्हीकेचे आमदार एन. इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर प्रोजेक्ट मेघालयची माहिती समोर आली. इलैयाराजा यांनी असा आरोप केला होता की, जूनच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणातील मुख्य आरोपी थिरुनावुक्कारासु आणि त्याच्या साथीदारांनी टीव्हीकेमध्ये बंड करण्यासाठी त्यांना ३५ कोटींची ऑफर दिली होती.

Project Meghalaya | TVK MLAs | Tamil Nadu Politics
Lohagad Murder Case : केतनच्या हत्येसाठी सियाचं 'हादरवणारं प्लॅनिंग'; 2 तासांचा जपानी व्हिडिओ अन् 'कॉन्ट्रॅक्ट किलर'शी डील

मात्र, आपण ती ऑफर नाकारल्याची माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. शिवाय ऑफर नाकारल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तर पोलिसांच्या हाती जे पुरावे आले आहेत त्यानुसार विजयन हे मुख्य आरोपी थिरुनावुक्कारासुच्या संपर्कात होते. त्याला मेसेजही करत होते, त्यामुळे त्यांचा फोन जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Project Meghalaya | TVK MLAs | Tamil Nadu Politics
Nanded News: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं! वरिष्ठांना दोष देत ZP शिक्षकाने दोन मुलांसह संपवलं आयुष्य; कारमध्ये बसून ती नदीत घातली

दरम्यान, 'प्रोजेक्ट मेघालय' प्रकरणी डीएमकेचे माजी मंत्री सेंथिल बालाजी आणि त्यांचा भाऊ अशोक यांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, डीएमकेने हे आरोप फेटाळले आहेत. तर "टीव्हीके या प्रकरणात राजकीय फायदा घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. टीव्हीकेच्या नेत्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आम्ही या प्रकरणी कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ", असंही डीएमकेने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com