ED Raid : काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या निवासस्थानी EDचा छापा; पहाटे 5 वाजताच 3 गाड्यांतून अधिकारी दाखल, सुरक्षा जवान तैनात

ED raids former Punjab minister Sundar Sham Arora's Residence: पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या होशियारपूर येथील निवासस्थानी ईडीने पहाटे छापा टाकला. तीन वाहनांतून आलेल्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.
ED raids former Punjab minister Sundar Sham Arora's Residence
ED raids former Punjab minister Sundar Sham Arora's ResidenceSarkarnama
Published on: 
Updated on: 

पंजाब :पंजाबमधील होशियारपूर येथे सोमवारी पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने अचानक छापा टाकला पहाटेच केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांमधून ईडीचे अधिकारी होशियारपूरमधील जोधा मल रोड येथे असलेल्या अरोरा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. घरात प्रवेश केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासाची प्रक्रिया सुरू केली. ही कारवाई अचानक झाल्याने स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

निवासस्थानाला सुरक्षा जवानांचा वेढा

ईडीच्या पथकाने अरोरा यांच्या घरात प्रवेश केल्यानंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. निवासस्थानाच्या आसपास सुरक्षा जवान तैनात करण्यात आले असून घराला वेढा घालण्यात आला आहे. तपास पथकाकडून घराच्या आत कारवाई सुरू असल्याने बाहेरील हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे.

ED raids former Punjab minister Sundar Sham Arora's Residence
Pollution Free Diwali: उच्च न्यायालयाचा आदेश! शिक्षण विभाग अॅक्शन मोडमध्ये; दिवाळीआधी शाळांना महत्त्वाचा आदेश

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी घरी पोहोचले, त्यावेळी सुंदर शाम अरोरा हे स्वतः निवासस्थानी उपस्थित होते. त्यामुळे तपास पथकाच्या या कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून अद्याप तपासाबाबत कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

ED raids former Punjab minister Sundar Sham Arora's Residence
Shalarth Portal News: 'शालार्थ'मध्ये घोळ! 3,625 शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचारी; शिक्षण विभागाचा दणका, वेतन अडकले,15 नोव्हेंबरची डेडलाइन

कोणत्या प्रकरणात कारवाई? अधिकृत माहिती गुलदस्त्यात

सुंदर शाम अरोरा यांच्या निवासस्थानी ईडीने कोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने ही धाड टाकली, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. तपासासाठी कोणते दस्तऐवज किंवा इतर पुरावे लक्ष्य करण्यात आले आहेत, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.

ED raids former Punjab minister Sundar Sham Arora's Residence
न्यायाधीश होण्याआधीच संन्यासाचा निर्णय! विंटेज कार अन् राजेशाही बग्गीतून निरोप; कोण आहेत प्रखरश्री दीदी?

या कारवाईमागील कारणांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. त्यामुळे छाप्याचा नेमका उद्देश काय, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, तपास पथकाची कारवाई सुरूच असल्याने अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे. ईडीकडून तपासाचे कारण स्पष्ट झाल्यानंतरच या कारवाईमागील नेमके प्रकरण आणि पुढील घडामोडींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.