

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारमधील काही मंत्र्यांबाबत मोठा दावा केला आहे. केंद्र सरकारमधील काही मंत्री विरोधी पक्षांच्या संपर्कात असून, सरकारमधील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती विरोधकांना देत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, येत्या 8 महिन्यांत या घडामोडींचे परिणाम दिसून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी शिकागो विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यशास्त्राचे प्राध्यापक रॉबर्ट पेप यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारतीय राजकारण आणि मोदी सरकारच्या कामकाजावर भाष्य केले.
भाजपची अंतर्गत संघटनात्मक रचना कमकुवत होत असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेते विरोधकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांच्या मते, केवळ भाजपमधील मंत्रीच नव्हे, तर निवडणूक आयोगातील काही वरिष्ठ अधिकारीही सध्याच्या परिस्थितीवर नाराज आहेत.
निवडणूक आयोगाच्या अंतर्गत घडामोडींची माहिती विरोधकांपर्यंत पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले. आयोगातील वरिष्ठ अधिकारी आता ही परिस्थिती पुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे सांगत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीत अनियमितता होत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट केली. निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींमुळे विरोधक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. कारण, निवडणुकांपासून दूर राहिल्यास लोकशाही व्यवस्था आणखी कमकुवत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.