

Priyanka Gandhi Son News : मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावरून उतरून आंदोलन करत आहेत. त्यांना सत्ताधारी भाजप आणि एनडीएकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच प्रियांका गांधी यांचा लेक रेहानच्या फोटोंवरून वाद समोर आलला आहे.
नवी दिल्लीतील सांस्कृतिक केंद्र असलेल्या बीकानेर हाऊसमध्ये रेहानने काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन लागले आहे. रेहान हा छायाचित्रकार असून त्याने नुकतीच झालेल्या आंदोलनांचे काढलेल्या फोटोंचा या प्रदर्शनात समावेश आहे. त्यातील ७० हून अधिक फोटो आयोजकांनी प्रदर्शनातून काढून टाकल्याचा आरोप होत असून त्यावरूनच वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित फोटो हे राजकीय स्वरुपाचे असल्याने हटविण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून केला जात आहे. त्यावर रेहान यांच्या आई खासदार प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्या असून त्यांनी सोशल मीडियात रेहानचा फोटो पोस्ट करून सूचक संदेश दिला आहे. रेहानवर मला गर्व असून नेहमीच राहील, असे म्हणत त्या लेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्याही राहिल्या आहेत.
एखादी ताकदवान व्यक्ती...
प्रियांका गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा एखादी ताकदवान व्यक्ती दुसऱ्याच्या अभिव्यक्तीला घाबरू लागतो, तेव्हा त्याला कल्पनाही नसते की तो त्याची ताकद आधीच गमावून बसला आहे, ज्याला वाचविण्याचा तो प्रयत्न करतोय. तू सत्यासोबत उभा आहेस. प्रत्येक सुंदर गोष्ट तुझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग शोधत येईल. मला तुझा गर्व असून नेहमीच असेल, असा संदेश प्रियांका गांधींनी लेकाला दिला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत काँग्रेस विरुध्द भाजप असा संघर्ष सुरू आहे. भाजपकडून राहुल गांधींना टार्गेट केले जात आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून पुढील आठवड्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.